Home बुलडाणा काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला धुतले

काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला धुतले

176

 

आमदार राहुल बोंद्रे एक्शन मोड मध्ये ,

अमीन शाह

बुलढाणा

माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेसह काही पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याने आज चिखली शहरात खळबळ उडाली. या घटनेची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहिती नुसार मारहाण झालेल्या भाजपा च्या चे कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी सांगितले की, माझ्या मुलाचा आज दहावीच्या पेपर होता मी त्याला सोडण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलो होतो. मी शिवाजी विद्यालयासमोर मुलासह उभे असताना तिथे माजी आमदार राहुल बोंद्रे कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विरोधात फेसबुकवर काय पोस्ट टाकली, अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी माझा मोबाईल फेकून दिला. मी पळालो असता सर्वांनी माझा पाठलाग करून मला बेदम मारहाण केल्याचा आरोप वाकदकर यांनी केला आहे. या घटनेची तक्रार पोलिसांना दिली असल्याचे वाकदकर यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल बोन्द्रे यांनी मारहाण का केली याचे कारण त्यांनाच विचारा’ अशी प्रतिक्रिया बोन्द्रे यांनी दिली. वाकदकर यांनी मागील काळात फेसबुकवर अनेकदा आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकल्या आहेत. नुकतेच निधन झालेल्या माझ्या वडिलांबद्दल ( स्व. तात्यासाहेब बोन्द्रे ) त्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली. दुर्देवाने काही जण त्याचे समर्थन करीत आहे. आजची घटना किरकोळ आहे, भविष्यात वाकदकर सारख्या प्रवृत्तींचे समर्थन करणाऱ्यांना देखील याचा सामना करावा लागू शकतो, असा गर्भित इशाराही राहुल बोन्द्रे यांनी यावेळी दिला

 

गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू ?

दरमियान या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार
जखमी श्याम वाकदकर यांच्या तक्रारी वरून बुलडाणा पोलिसांनी आमदार राहुल बोन्द्रे यांच्यावर विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून बातमी लिहोस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ,

 

काय म्हणाले माजी आमदार राहुल बोन्द्रे