Home बुलडाणा देउळगावराजा येथे पुन्हा झाली लाखोंच्या तंबाखू मालाची चोरी ,

देउळगावराजा येथे पुन्हा झाली लाखोंच्या तंबाखू मालाची चोरी ,

107

 

त्या चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती ,?

अमीन शाह ,

बुलढाणा

देउलगावराजा येथे गेल्या वर्षी शौकत खान कोटकर यांच्या गोडाऊन मधून चोरट्यांनी तंबाखू मालाची चोरी केली होती ते चोरटे अन त्यांचा वाहन सी सी टीव्ही कँमेरऱ्यात कैद झाले होते मात्र एक वर्ष उलटून ही स्थानिक पोलीस या चोरट्यां पर्यंत पहोचू शकले ते अपयशी ठरले असे असतांना आता चोरट्यांनी पुन्हा एकदा येथे तंबाखू मालाची चोरी केली ,

देऊळगावराजा शहरातील जालना मार्गावरील रामदेव एजन्सीच्या गोडाऊनचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 14 हजार रुपयांच्या गायछाप तंबाखूच्या 32 गोण्या लंपास केला ही घटना 14 मार्च च्या मध्यरात्री घडली असून, 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
येथील गोविंद रमेशचंद्र सराफ यांचे जालना मार्गावर रामदेव एजन्सी नावाचे किराणा माल व गाय छाप तंबाखूच्या मालाचे गोडाऊन आहे. अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून माल लंपास केल्याचे 15 मार्चला समोर आले. याबाबत गोविंद रमेशचंद्र सराफ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहे. गेल्या वर्षी येथे गोडाऊन चे शटर फोडून तंबाखू मालाची चोरी झाली होती व चोरटे सि सी टीव्ही केमेऱ्यात कैद झाले होते मात्र आज पर्यंत त्या चोरीचा तपास पोलीस लावू शकले नाही त्याच प्रमाणे या चोरीचा ही तपास लागणार की नाही अशी चर्चा केली जात आहे ,