Home मुंबई रिपब्लिकन पॅन्थर नेते दिवंगत ईश्वर कांबळे यांचे नाव देण्यात यावे. (आरपीआय संविधान...

रिपब्लिकन पॅन्थर नेते दिवंगत ईश्वर कांबळे यांचे नाव देण्यात यावे. (आरपीआय संविधान पक्षाची मागणी)

60

मुंबई दि (प्रतिनिध) अंधेरी पूर्वे गौतम नगर परिसरातील के पूर्व वार्डातील रस्ता क्रमांक 8 ला रिपब्लिकन पॅन्थर नेते दिवंगत ईश्वर कांबळे यांचे नाव देण्यात येण्याची मागणी आरपीआय पक्षाची पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त व के पूर्व वॉर्ड उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
मुळात शिवणकाम व्यवसायाचा पिंड असणाऱ्या *दिवंगत ईश्वर कांबळे* यांनी ह्यातीत MIDC अंधेरी पूर्व परिसरातील गर्जू लोकांची कामे केली असून असंख्य लोकांच्या अडचणीत धावून त्यांचे प्रश्न सोडवले होते. त्यांना जानणारे लोक आजही त्यांच्या कार्याची तोंडभरून प्रशंसा करतात.

दिवंगत पॅन्थर नेते आमदार टी. एम. कांबळे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी आंबेडकर चळवळ मजबूत केली, असंख्य आंदोलने यशस्विरित्या पार पाडली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करत असतांना असंख्या रुग्णांना त्यांनी उपचार मिळवून दिले.

तसेच परिसरात होऊ घातलेल्या एस.आर.ये प्रकल्पात मूळ झोपडीधारकांना प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी अथक प्रयत्न करून प्रकल्पात समाविष्ठ करून सदनिका प्राप्त करून दिल्या.

“चैत्यभूमी” डॉ. आंबेडकर स्मारक मुंबई येथे 6 डिसेम्बर रोजी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणाऱ्या भीम अनुयायांना उपास्मारीची वेळ येऊ नये यासाठी स्व:खर्चाने हजारो लोकांची भूक व तहान भागावी यासाठी अन्नदान व जलदान उपक्रम राबवत असत.

आंबेडकरी चळवळीतील ढान्या वाघ, दिवंगत ईश्वर कांबळे यांचे रस्ता क्रमांक – 8 ला *”रिपब्लिकन पॅन्थर नेते दिवंगत ईश्वर कांबळे मार्ग, रस्ता क्रमांक -8″* असे नाव देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाल्यास उग्रा आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी पत्रकारांना बोलताना दिला.