Home बुलडाणा निराधार उत्तमला दिव्यासेवा फाऊंडेशन दिला आधार

निराधार उत्तमला दिव्यासेवा फाऊंडेशन दिला आधार

55

पत्रकारांनी घेतला पुढाकार, दिला मदतीचा हात तब्बल 2 दिवसानंतर मीळाला निवारा

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-एकीकडे माणुसकी व संवेदनशीलता उरली नसल्याची चर्चा होत असतानाच सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील उत्तम गुंजकर या ंवयोवृद्ध बापाला मुलांनी देऊळगावराजा शहराच्या मध्यवस्तीत सोडून निघून गेले. त्या निराधार अवस्थेत असल्याने स्थानिक मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत यांनी त्या वयोवूद्धास विचारपूस केल्यावर मुलगा व सुन यांनी मला सोडून निघून गेले असे सांगितले. परंतु माणुसकी नसल्याने मुलांनी बापाला संभाळणार नाही असे उत्तर दिल्यावर पत्रकारांनी पुढाकर घेत बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट येथील दिव्यासेवा फाऊंडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्या वयोवद्धाला दिला मदतीचा हात.
दि 4 मार्च रोजी दुपारी स्थानिक चौंडेश्वरी मंदीर चौकात एक ७० वर्षीय इसम सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील रहेवासी उत्तम सखाराम गुंजकर निराधार अवस्थेत मिळून आल्याने नागरिकांच्या समक्ष विचारपूस केल्यावर त्याचा मुलगा आणि सुन यांनी या ठिकाणी सोडून गेल्याचे सांगितले पत्रकार सुषमा राऊत यांनी पत्रकार प्रताप मोरे यांच्याशी संपर्क केल्यावर राजु उत्तम गुंजकर यांच्या मोबाईल वर संपर्क करण्यात आले असता आर्थिक परिस्थितीमुळे ते वडीलांना सांभाळू शकत नसल्याचे सांगितले. म्हणून त्या वृद्ध निराधारांचे अश्रू पुसण्यासाठी व त्याला आधार देण्यासाठी स्थानिक पोलिस निरिक्षक जयवंत सातव यांच्या काडे माहिती देण्यात आली आणि बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट येथील दिव्यसेवा फांऊडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्या शी संपर्क करण्यात आले. आणि त्यांनी उत्तम गृंजकर या वयोवृद्धास संरक्षण व संगोपण करीता स्वीकरण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिक नागरिका समक्ष दिव्यासेवा प्रकल्पचे संचालक अशोक काकडे व इतर स्वयंसेवकाकडे सदभावनापूर्वक सुपुर्द केले. याप्रसंगी पत्रकार चंद्रभान झिने व इतर पत्रकार उपस्थित होते.
भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास घालने, ही भावना माणसाला आनंदायी बनविते. नेमका हाच आनंद येथील पत्रकारांनी ४ मार्च रोजी अनुभवला. निराधार झालेल्या वयोवृद्ध उत्तम गुंजकरना दिव्यासेवा फाऊंडेशनचे संचालक अशोक काकडे यांच्या सपुर्द करुन त्यांची सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.