Home पालघर क्रिकेट खेळाबरोबर तरुणांनी कामं धंद्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज माजी. उपसभापती चंद्रकांत...

क्रिकेट खेळाबरोबर तरुणांनी कामं धंद्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज माजी. उपसभापती चंद्रकांत रंधा यांचे तरुणांना आवाहन

74

जव्हार (सोमनाथ टोकरे )

मोख्याचा पाडा प्रीमियर लीग 2023 कौळाले ग्रामपंचायत विभाग आयोजित स्पर्धेत मार्गदर्शन करताना चंद्रकांत रंधा साहेब माजी. उपसभापती पंचायत समिती जव्हार बोलले कि, तरुणांनी क्रिकेट खेळाबरोबरच अन्य खेळाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, तसेच खेळाबरोबरच कामं धंदा, शिक्षण आणि नोकरी कडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे त्यांचबरोबर तरुणांनी विकास कामाकडे सहभागी झाले पाहिजे.आणि युवती यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी देखील केली पाहिजे आणि मोठं मोठया अधिकारी पदावर आपल्या भागातील मुलं विराजमान झाली पाहिजेत.
लीग च्या माध्यमातून मोठया प्रमाणात आदिवासी बांधव एकत्र येऊन गुण्यागोविंद्याने खेळ खेळतात त्यामधून एकमेकांप्रति स्नेहभाव अधिक वृद्धिंगत होतो आणि एकोपा टिकून येण्यास सुद्धा खूप मोठया प्रमाणात मदत होते, विशेष म्हणजेच या स्पर्धेत सर्वच समाजातील मान्यवर मंडळी येऊन स्पर्धेला खूप मोठया प्रमाणात मदत करतात.
त्यामुळे सर्वच घटक एकत्र येऊन या स्पर्धेचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तेही एक महत्वाचे कारण आहे. तरी तरुणांनी खेळा बरोबर कामा कडे आणि शिक्षणा कडे सुद्धा बघितलं पाहिजे असे चंद्रकांत रंधा यांनी तेथील तरुणांना बोलताना मार्गदर्शन केले.