Home विदर्भ अभाविप राष्ट्रभक्त विद्यार्थी घडविणारे बलाढ्य संघटन – हंसराज अहीर

अभाविप राष्ट्रभक्त विद्यार्थी घडविणारे बलाढ्य संघटन – हंसराज अहीर

72

उत्कर्ष छात्रशक्तीचा विद्यार्थी सम्मेलनाचे हंसराज अहीर यांचे हस्ते थाटात उद्घाटन

चंद्रपूर – राष्ट्रसमर्पित देशभक्त छात्रशक्ती संघटन निर्माण करण्याचे कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निरंतर केले आहे. अभाविपच्या या असामान्य कार्यामुळे राष्ट्रोन्नतीला वाहून घेणाÚया युवकांची मोठी फौज देशात उभी राहिली हे देशाचे व सरकारचे मोठे यश आहे. विद्याथ्र्यांना देशभक्तीचे धडे देणे व देशाचा खरा इतिहास विद्याथ्र्यांपर्यंत पोहचविणे ही काळाची गरज असून अभाविपने हे शिवधनुष्य उचलावे असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून केले.
दि. 28 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित अभाविपच्या उत्कर्ष छात्रशक्तीचा- जिल्हा विद्यार्थी सम्मेलनाचे दीप प्रज्वलनाने विधीवत उद्घाटन केल्यानंतर हंसराज अहीर बोलत होते. या कार्यक्रमास शक्ती केराम, विदर्भ प्रांत मंत्री, प्रा. डाॅ. पंकज काकडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष अभाविप, डाॅ. रोहन आईंचवार, हृदयरोगतज्ञ, सौ शुभांगी उंबरकर(नक्षिणे), सिनेट सदस्य, शैलेश दिंडेवार, जिल्हा संयोजक, रोहित खेडकर, नगर महामंत्री, वैदेही मुडपेल्लीवार, प्रांत कार्यकसमिती सदस्य आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात हंसराज अहीर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर युवकांना सैन्यात सामिल होण्याचे नेहमीच आवाहन करायचे. या मागे त्यांची दूरदृष्टी होती. राष्ट्र उत्कर्षाचे स्वप्न होते. विद्याथ्र्यांनी, पालकांनी या स्वप्नांचा पाठलाग करीत देशभक्तीने प्रेरीत होत सैनिकी शिक्षण घेण्यास पुढे यावे. माननिय प्रधानमंत्र्यांची अग्नीवीर ही योजना त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक असून बलशाली राष्ट्र व सैन्य सज्जता असणारा देश म्हणून भावी काळात भारत जागतिक स्तरावर नावाजला जाईल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले केंद्र सरकारने विद्याथ्र्यांकरीता देशभरात शेकडो वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विद्याथ्र्यांसाठी वसतीगृहांची स्थापना केली जाणार आहे. कौशल्य विकास योजनेद्वारा बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. आत्मनिर्भर व उत्पादक भारत ही संकल्पना नजीकच्या काळात साकार होईल असा आशावाद व्यक्त करीत अहीर यांनी अभाविपचे विद्याथ्र्यांसाठी असलेले योगदानाची प्रशंसा करीत देशभक्त छात्र संघटनेला अनेक महनीय नेत्यांच्या कार्याने व मार्गदर्शनाने नवी झळाळी लाभली आता नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी हे कार्य दखलपात्र ठरविण्याकरीता परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.
देशात बांगलादेशी व रोहिंग्यांच्या घुसखोरी विरुध्द सरकारने उचललेल्या पाऊलांमुळे घुसखोरीचा प्रश्न निपटून काढण्यात यश लाभले आहे असेही अहीर म्हणाले. याप्रसंगी हंसराज अहीर व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते सिनेट सदस्य सर्वश्री प्रशांत दोंतुलवार, गुरुदास कामडी, यश बांगडे, संजय रामगीरवार, डाॅ सागर वझे, विजय बदखल, डाॅ सुधिर भोंगे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा भरातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.