Home यवतमाळ युवकाचा पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न (मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई...

युवकाचा पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न (मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल)

242

यवतमाळ / हरीश कामारकर

अवैध धंद्यांची तक्रार का केली म्हणुन तक्रारकर्त्या युवकास मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाईची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी केली होती परंतु जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कोणतीही कारवाई न केल्याने पीडित युवकाने पोलीस स्टेशनमध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (१ मार्च)बुधवार रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महागाव येथे घडली.
महागाव तालुक्यातील कलगाव येथील समाधान राऊत या युवकाने अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी तक्रार दिनांक २३ जानेवारी२०२३ रोजी महागाव पोलिस स्टेशन ला दिली होती.त्यानंतर १३फेब्रुवारी रोजी आपल्या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याची चौकशी करण्यासाठी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आला असता त्यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी राऊत याला अवैध धंद्याची तक्रार का केली याचा जाब विचारत अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यामुळे झालेल्या प्रकाराने मानसिक व शारीरिक त्रास सहन करून पीडित युवकाने या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदन सादर करून कारवाई न झाल्यास १ मार्च रोजी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता परंतु पोलीस प्रशासनाकडून या युवकांच्या इशाऱ्याला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केल्याने उद्विग्न झालेल्या समाधान राऊत या युवकाने आज(१मार्च) बुधवारला सकाळी पेट्रोलची बॉटल सोबत घेवुन महागाव पोलीस स्टेशन गाठले यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून पेट्रोल ची बॉटल हिसकावून घेतली व त्याची समजुत काढत असतांनाच कर्मचाऱ्यांची नजर चुकवुन त्याने बाजुला ठेवलेली पेट्रोल ची बॉटल घेवुन अंगावर पेट्रोल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.महागाव पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले हा प्रकार घडला तेव्हा पोलीस स्टेशनला एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता.
###चौकट####
कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करू.
महागाव येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असुन आपण प्रकरणाची पुर्ण व सखोल माहिती घेवुन पुढील दिशा ठरवु जेणे करून कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष घालुन न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करू.
:-आ.नामदेवराव ससाणे
####चौकट###
चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल.
महागाव पोलीस स्टेशनमध्ये जो प्रकार घडला त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी केल्या जाईल व तो अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील.
:- प्रदिप पाडवी(उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड)