Home सांगली शिवशाही फाउंडेशन,भारत च्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय संवर्धन केंद्राच्या संचालकपदी डाॅ.अमोल यमगर ( MVSc,PhD)यांची...

शिवशाही फाउंडेशन,भारत च्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय संवर्धन केंद्राच्या संचालकपदी डाॅ.अमोल यमगर ( MVSc,PhD)यांची निवड….

75

सांगली – .शिवशाही फाउंडेशन,भारत ही संस्था महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन तसेच ‘जय भवानी जय शिवाजी ‘,’बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ही विचारसरणी असलेल्या संस्थेच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय संवर्धन केंद्राच्या संचालकपदी डाॅ.अमोल यमगर ( MVSc,PhD) रा.जत जि.सांगली यांची निवड करण्यात आली आहे.गेली 15 वर्षे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विविध काम करत आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे व कोणतेही काम उत्कृष्टरित्या करणे. आज पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम केले आहेत. सामाजिक कामात जिवाची व कुटूंबाची परवा न करता समाजासाठी काम करणे हा त्याचा स्वभाव आहे. गेली 15 वर्ष पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याची ‘ DR.AMOL ANIMAL CLINIC ‘ नावाने अंधेरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. दवाखाना तर्फ मोफत पशुवैद्यकीय प्रशिक्षण शिबीर व गरजू लोकांना साहित्य वाटप करतात.ते मुंबई महानगरातील सुप्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून परिचित आहे.आजपर्यंत त्यांनी 5000 अवघड पशुशस्त्रकीया केल्या आहेत.आपली संस्था देशातील विविध राज्यात आपले समाज कार्य करत आहे. या संस्थेचे कार्य समाजात राष्ट्रीयत्व, बंधुता ,न्याय, समता या भावना निर्माण करणे व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे .या संस्थेचे शैक्षणिक, आरोग्य ,कला व व सांस्कृतिक ,क्रीडा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तिकरण, सामाजिक न्याय,शासकीय योजना व कार्यशाळा शिबिर, संशोधन या संबंधीत कार्यशाळा आशा विविध क्षेत्रांमध्ये त्याचे कार्याने व्यापले आहे. संस्थेमध्ये सर्वांना सर्वांना समान अधिकार आहेत. डाॅ.अमोल जी संस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी तसे समाजाहितासाठी प्रामाणिकपणे व प्राधान्याने काम करतील असा विश्वास संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर यांनी व्यक्त केला.