Home यवतमाळ धनादेश अनादरीत प्रकरणात आरोपीला ₹ 6 लाख 4 हजार 665 रुपये दंड;...

धनादेश अनादरीत प्रकरणात आरोपीला ₹ 6 लाख 4 हजार 665 रुपये दंड; 60 दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास 2 महिन्याची शिक्षा..!

67

अयनुद्दीन सोलंकी 

घाटंजी, 28 फेब्रुवारी – तालुक्यातील खापरी येथील आरोपी सुरज विलासराव साबापुरे यांस निगेशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 चे कलम 138 अंतर्गत 6 लाख 4 हजार 665 रुपयाचा दंड घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी ठोठावला आहे. दंडाची रक्कम 60 दिवसांत भरली नाही तर 2 महीण्याची साधी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. घाटंजी येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ॲड. चंद्रकांत मरगडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

केशव नागरी सहकारी पतसंस्था, घाटंजी येथील शाखेतुन खापरी येथील सुरज विलासराव साबापुरे याने 10 फेब्रुवारी 2017 रोजी 2 लाख 50 हजार रुपयाच्या कर्जाची उचल केली होती. त्यापोटी केशव नागरी सहकारी पतसंस्थेला आरोपी सुरज साबापुरे याने 3 लाख 64 हजार 665 रुपयाचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश घाटंजी येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत वटविण्यासाठी टाकला असता सदरचा धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादरीत होऊन बॅंकेतुन परत आला.

त्यामुळे आरोपी सुरज साबापुरे विरुद्ध घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात निगेशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 138 अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणात बॅकेचा चेक रिटर्न मेमो, ईतर पुरावे ग्राह्य धरुन आरोपी सुरज विलासराव साबापुरे यांस 6 लाख 4 हजार 665 रुपयाचा दंड दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी ठोठावला आहे. तसेच 60 दिवसांत दंडाची रक्कम भरली नाही तर 2 महिन्याची साधी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

आरोपी सुरज साबापुरे यांचेतर्फे ॲड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले. तर केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ॲड. चंद्रकांत मरगडे यांनी बाजू मांडली.