Home पश्चिम महाराष्ट्र पञकारांच्या न्याय हक्कासाठी पुणे “पञकार संरक्षण समिती” चे गृहमंञ्यांना निवेदन….!

पञकारांच्या न्याय हक्कासाठी पुणे “पञकार संरक्षण समिती” चे गृहमंञ्यांना निवेदन….!

167

पुणे ( प्रतिनिधी ) – दि. २७/०२/२०२३ पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा/ शहर च्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांची झालेली निर्गुण हत्याची फास्ट ट्रॅक केस कोर्टात चालवण्याची मागणी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील यांनी पत्रकार बांधवा समवेत पुणे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख द्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या कडे करण्यात आली आहे. पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत.

तसेच पत्रकारांवर हल्ले करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करतात. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी व्हावी. महाराष्ट्रात निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. शशिकांत वारेसे यांच्या निर्गुण हत्याचा आम्ही निषेध करत आहोत. या गोष्टीची गांभीर्याने आपण दखल घ्यावी व महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा/शहर वतीने करण्यात आली. भविष्यात पत्रकारांवर वारंवार कुठलीही झालेल्या हल्ल्यांची गोष्टींची शहानिशा न करता गुन्हे दाखल करू नये जर केले तर लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकार मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील. पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,प्रदेश सचिव अनिल चौधरी, पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र खुडे,पुणे शहर अध्यक्ष रोहित दळवी उपाध्यक्ष विनोद धसाडे ,डॉ. मोहन वाघ, गौरव गिरी,मोमीन, सचिन झांबरे रमेश शेंडगे सह पत्रकार उपस्थित होते.