Home मराठवाडा बदनापूर नगर पंचायत मुख्यधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना अटक

बदनापूर नगर पंचायत मुख्यधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना अटक

171
0

लाच प्रकरण भोवले

बदनापूर – सय्यद नजाकत

जालना , दि. ०१ :- बदनापूर नगर पंचायत मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दृलक्ष होत असल्याने अधिकारी,कर्मचारी मनमानी कारभार करीत असून अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून देयके अदा केली जात आहे,केवळ लाच मिळाली की कामे होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नगर पंचायत मधून बियर शॉपी साठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर निर्धारक गणेश सुरवसे यांना 20 हजाराची लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांना अटक करून न्यायलयत हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला .

बदनापूर ग्राम पंचायत चे 2015 मध्ये नगर पंचायत मध्ये रूपांतर झाले आणि 2017 पासून कोट्यवधींचा निधी नगर पंचायत ला प्राप्त होऊ लागला,विविध विकास कामासाठी येणारा निधी काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने थातूर मातूर कामे करून गुत्तेदार लाटत आहे,नागरिकांनी तक्रारी केल्यातरी अधिकारी लक्ष देत नाही व देयके अदा केली जातात तर वरिष्ठ पातळीवर देखील बदनापूर नगर पंचायत कार्यालयाच्या विरोधात आलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे नगर पंचायत मधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला असून कोणतेही प्रमाणपत्र असो की परवानगी पैसे मोजल्याशिवाय मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

नगर पंचायत मध्ये अधिकारी व कर्मचारयांनी मनमानी कारभार सुरू केल्याने वैतागलेल्या एका नागरिकाने थेट लाचलुचपत विभाग गाठले आणि बियर शॉपी च्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी कर निर्धारक गणेश बाबुराव सुरवसे यांनी 35 हजाराची मागणी केली असून तडजोडी अंती 20 हजार ठरल्याचे तक्रारीत नमूद केले असता 27 जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने बदनापूर नगर पंचायत मध्ये सापडा रचून 20 हजाराची लाच घेताना सुरवसे यांना रंगेहाथ धरले व अटक केली होती .

आरोपी लोकसेवक गणेश बाबुराव सुरवसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली होती व तपास कामी एक दिवस आरोपीस पोलीस कोठळी मिळाली होती दरम्यान चौकशी मध्ये सदर लाच घेण्यास नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांनी प्रोत्साहन दिल्याचे आढळून आल्याने 1 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाने डॉ पल्लवी अंभोरे यांना ताब्यात घेऊन अटक केली व न्यायालय पुढे हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक अनिता जमादार,पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे,एस एस शेख,कर्मचारी ज्ञानदेव जुंबड,मनोहर खंडागळे,राम मते,अनिल सानप,आत्माराम डोईफोळे,कृष्णा देठे, सचिन राऊत,शिवाजी जमधळे,गजानन कांबळे,गणेश चेके, खंदारे,शेख यांनी पार पाडली .

Previous article“संविधान के सम्मान में हम निकले मैदान में “जैसे नारों से गुंजा शहर
Next articleआठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ देवास रथसप्तमी निमित्त महाअभिषेक
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here