Home मराठवाडा आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ देवास रथसप्तमी निमित्त महाअभिषेक

आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ देवास रथसप्तमी निमित्त महाअभिषेक

57
0

रथातुन मंदिराची प्रदक्षिणा….!

एकनाथराव अंभोरे पाटील

परभणी / वसमत , दि. ०१ :- औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ देवास रथसप्तमी निमित्त महाभिषेक करून रथाची पूजा करण्यात आली . आज रथसप्तमी म्हणजे पाैष कृष्ण सप्तमी.उत्तरायणात या सप्तमीपासून दिवस मोठा होत असतो त्यामुळे या सप्तमीला अनन्य साधारण महत्व आहे.प्रत्येक घरी या दिवशी तीळ गुळाच्या पोळ्या करून सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवला जातो.घरोघरी महिला सूर्य रथ आणि त्यावर आरुढ सूर्य नारायण अशी प्रतिमा काढून त्याची पूजा करत असतात.
याच दिवशी ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरातील महाशिवरात्री नंतर होणाऱ्या रथोत्सवाची सुद्धा आज पूजा केली जाते.रथ बाहेर घेऊन साफसफाई स्वच्छता करून त्याची पूजा करून आजपासून महाशिवरात्रीच्या उत्सवाला या रथोत्सवाने महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत असते.या वर्षी महाशिवरात्री पर्व एकवीस फेब्रुवारी या दिवशी असून रथोत्सव चंद्रदर्शन द्वितीय म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी या दिवशी आहे यावेळी लाखो लोक या ठिकाणी ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी रथोत्सव उत्साहामध्ये पार पाडत असतात श्रींची मुकुट प्रथांमध्ये ठेवून मंदिराला पाच प्रदर्शना केला जातात हर हर महादेव ओम नम शिवायच्या गजरामध्ये ह्या पाचही प्रदर्शना पूर्ण होऊन महाशिवरात्रीच्या उत्सवाची सांगता होत असते.सकाळी श्री नागनाथ प्रभू सहसचिव विद्याताई पवार यांनी महापूजा केली .त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड ,माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,माजी सचिव गजानन वाखरकर ,विश्वस्त गणेश देशमुख, विश्वस्त सल्लागार डॉ विलास खरात, विश्वस्त प्रा देविदास कदम, विश्वस्त सल्लागार आनंद निलावार, देवस्थानचे व्यवस्थापक शंकर काळे, देवस्थानचे मॅनेजर वैजनाथ पवार, नागेश माने, कृष्णा पाटील,नामदेव पवार सह विश्वस्त ,विश्वस्त सल्लागार कर्मचारी उपस्थित होते.