Home महत्वाची बातमी गुन्हे शाखेचे सहआयुक्त विशाल ढुमे वर महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल ,

गुन्हे शाखेचे सहआयुक्त विशाल ढुमे वर महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल ,

85
0

सहआयुक्त विशाल ढुमे वर महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल ,

 

रक्षकच झालं भक्षक ,

औरंगाबाद,
घरात जाऊन महिलेची छेड काढल्याचा आरोप सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर करण्यात आला आहे. महिलेन सिटी चौक पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटुंबीयांनी इमारतीच्या पायऱ्यांवर सुरू असलेला गोंधळाबाबत सीसीटीव्ही देखील पोलिसांना सुपूर्त केला आहे. घरात जाणे, महिलेची छेड काढणे असे कलम लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आला होता. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का, अशी विनंती विशाल ढुमे यांनी आपल्या मित्राला केली. त्यामुळे मित्रानेदेखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर विशाल ढुमे यांनी छेड काढण्यात सुरुवात केली, असा आरोप करण्यात आला.

घरात जाऊन काढली छेड:

मित्र आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागच्या सीटवर बसले होते. दरम्यान गाडीत बसताच दारूच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी गाडीतच महिलेची छेड काढायला सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी पुन्हा मित्राला विनंती केली. तर घराच्या इमारतीच्या बाहेर पोहचल्यावर तुमच्या बेडरूममधील वॉशरूम मला वापरायचा आहे म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. तक्रारदार महिलेचा पती आणि सासू त्यांना घरी जाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत अरेरावी केली. पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री पोलिसांना फोन करून बोलविले. त्यावेळी देखील ढुमे यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सीसीटिव्ही आले समोर या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांना देण्यात आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये नारळी भाग परिसरात असलेल्या इमारतीत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे हे पायऱ्यांवर उभे आहेत. त्यामध्ये महिला आणि दोन व्यक्ती त्यांच्याशी बोलत असून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर विशाल ढुमे यांनी नागरिकांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. यासंबंधी नारळी भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशाल ढुमे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Previous articleइंदापूर “पत्रकार संरक्षण समिती” चे वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने १०१ जणांचा सन्मान पत्रकार प्रवेश सोहळा उपस्थित राहण्याचे अहवान – अँड.संतोष शिंदे (हायकोर्टा वकील)
Next articleमकरसंक्राती च्या दिवशीच महिला पोलिसाचा दुर्देवी मृत्यू ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here