Home जालना मकरसंक्राती च्या दिवशीच महिला पोलिसाचा दुर्देवी मृत्यू ,

मकरसंक्राती च्या दिवशीच महिला पोलिसाचा दुर्देवी मृत्यू ,

60

 

मुलगा गँभीर जखमी

जालना ,

राजूर- भोकरदन महामार्गावरील हॉटेल हरिद्वार समोर सदर अपघात घडला . पोलिस शिपाई सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ या आपल्या मुलासह मकरसंक्रांत सणानिमित्त इब्राहिमपूर गावी जात होत्या . त्यांचा मुलगा स्कुटी चालवत असताना सामोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांची स्कुटी रस्त्याने जाणाऱ्या बैलगाडीवर जाऊन जोरदार आदळली . या अपघात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला . जखमी मुलगा रुग्णालयात स्कुटी चालवत असलेला त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला उपचरासाठी रुग्णालयात हलविले आहे . या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे . तर त्यांच्या इब्राहिमपूर गावात शोककळा पसरली आहे . घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा करत घटनेची नोंद पोलिस डायरीत करत या प्रकरणी पंचनामा ही केला आहे .