Home पश्चिम महाराष्ट्र इंदापूर “पत्रकार संरक्षण समिती” चे वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने १०१ जणांचा सन्मान...

इंदापूर “पत्रकार संरक्षण समिती” चे वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने १०१ जणांचा सन्मान पत्रकार प्रवेश सोहळा उपस्थित राहण्याचे अहवान – अँड.संतोष शिंदे (हायकोर्टा वकील)

226

पुणे – इंदापूर पत्रकार संरक्षण समितीचे वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने१०१ जणांचा सन्मान पत्रकार प्रवेश सोहळा उपस्थित राहण्याचे अहवान.अँड.संतोष शिंदे (हायकोर्टा वकील)

  इंदापूर पत्रकार संरक्षण समितीचे वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक २२/०१/२०२३ रोजी दुपारी बारा वाजता (निरा नरसिंह पुर येथे) सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून समाजा साठी काम करणाऱ्या निरा नरसिंह पुर (इंदापूर)परीसरातील१०१ पत्रकार, डॉक्टर, नर्स,शिक्षक,पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याची माहिती  पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार, कार्यध्यक्ष डाँक्टर सरवदे व इंदापूर पत्रकार संरक्षण समिती पदाधिकारी  यांनी दिली.  पत्रकार संरक्षण समिती इंदापूर कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हाधिकारी शंभरकर, सोलापूर जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, इंदापूर पोलीस निरीक्षक, मुंबई हायकोर्टा वकील संतोष शिंदे ,राजकीय प्रतिनिधी, पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,प्रदेश सचिव अनिल चौधरी, जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंदरे पाटील, कार्यध्यक्ष रविंद्र खुडे, पुणे शहर अध्यक्ष, पिंपरी चिंचवड अध्यक्ष सह जिल्हा प्रतिनिधी, जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.इंदापूर पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने गेली दोन वर्षे पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोरोना काळात काम करणाऱ्या निरा नरसिंह पुर (इंदापूर) परीसरातील पत्रकार, अंगणवाडी सेविका, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, पोलीस यांचा सन्मान करत असुन समाजासाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंदरे पाटील यांनी सांगितले.