Home सातारा नागरिकांनी मूलभूत कर्तव्ये जपावी – न्यायाधीश गौरव हांगे

नागरिकांनी मूलभूत कर्तव्ये जपावी – न्यायाधीश गौरव हांगे

171

सतीश डोंगरे

सातारा , दि. २८ :- रूरल ईन्स्टीट्युट आँफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँन्ड हाँस्पीटल मायणी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने संविधान जनजाग्रुती कार्यक्रमांतर्गत संविधानातील कलम 51अ संबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठीे न्यायाधीश मा.श्री.गौरव हांगे दिवाणी सहन्यायाधीश न्यायालय विटा यांचे व्याख्यान दि.25 जानेवारी2020रोजी आयोजीत केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. संविधानामध्ये कलम 51अ मध्ये नागरिकांनी देशाप्रती कोणत्या कर्तव्यांचे पालन करावे याचे वर्णन केले आहे.कलम 51 अ हा भाग 42 वी घटना दुरूस्ती 1976 अनुसार जोडण्यात आला.नागरिकांना जसे संविधानाने अधिकार दिलेत तशीच कर्तव्ये देखील हवीत यासाठी हा भाग जोडण्यात आला.भारतीय नागरिकांची एकूण मूलभूत कर्तव्य 11आहेत.यामध्ये राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा सन्मान करावा.

भारताची अखंडता,एकता ,सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे,देशाचे संरक्षण करावे व आव्हान करताच संरक्षणासाठी सामील व्हावे. सार्वजनीक संपत्तीचे संरक्षण करावे ईत्यादी कर्तव्याची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.आरबुणे ए.बी, संयोजक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डाँ.बारसिंग डी.बी. अँड.तुकाराम माळी आदि उपस्थीत होते.