Home विदर्भ यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा घोडेबार जोमात?

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा घोडेबार जोमात?

170

भाजपचे सुमित बाजोरिया बाजी मारतील की?महाविकास आघाडीचे उमेवार दुष्यंत चतुर्वेदी

नितीन सोनाळे

यवतमाळ / उमरखेड , दि. २८ :- ३१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना महाविकास आघाडी तर्फे मैदानात उतरविले आहे तर भाजपाने युवा चेहरा म्हणून सुमित बाजोरिया यांना समोर केले आहे. चार अपक्ष उमेदवार हे आपापल्या परिने मेहनत घेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यासाठी दुष्यंत चतुर्वेदी हे नवखे उमेदवार आहेत.तर भाजपाचे तरुण तडफदार उमेदवार सुमित बाजोरीला हे जवळचे आहेत. मतदार बाजुला असतांना प्रमुख नेते ‘विजय’ आमचाच म्हणत हवेत फैरी झाडत आहेत.
महाविकास आघाडीकडे पक्षाचे अधिकृत २८० आहेत असे सांगितले जाते. महाविकस अाघाडीचा आपल्या मतदारावर पूर्ण विश्वास नसल्याने सावधगिरी बाळगत या उमेदवारांना इतर ठिकाणी हलविण्यात येत आहे. भाजपा मधील पदाधिकारी नेते चाणाक्य व संयम ठेवणारे आहेत. भाजपानेही आपल्याकडे ४०० पेक्षा जास्त उमेदवार असल्याचा दावा केला आहे. विधानपरिषदेच्या मतदारांची एकून संख्या ४८९ एवढी आहे . विरोधी पक्ष आपल्या परीने आकडे फुलवून संख्या बळ दाखवित आहेत.
या घोडेबाजारीत वेगवेगळ्या टोकनाचा ‘लाभ’ दाखविण्यात येत आहे. मतदारही चालाख झाला आहे . एकदाची आयते अनुदान निधी उचलुन आपले भविष्य उज्वल करण्याच्या नादात आहेत. ज्या पक्षाकडून आपले पारडे ‘जड’ त्यांच्याच झोळीत मतदार या विचारात दिसतात. भाजपा पक्ष व नेते आपल्या पदाधिकारी ,कार्यकर्ते व जनतेच्या वेळो वेळी समस्य सोडविणारा पक्ष असल्याने सध्यातरी सुमित बाजोरीला यांचे नाव घेत आहेत. पडद्यामागील घडामोडीला वेग आला असून भाजपा व महाविकास आघाडी उमेदवार फोफाडीची व्युव्हचना आखत आहे. चांदा ते बांदा पर्यंत भाजपाकडे इमानदाव व मेहनती पदाधिकारी, कार्यकर्त्यांची टीम आहे .तर दुसरीकडे महाविकास आघातीकडे घरका भेदी,लंका ढाये म्हणत दोन गट निर्माण झाले आहेत.

महाविकास अाघाडीचे चतुर्वेदी यांना जनतातर दुरचं पण जवळचे कार्यकर्ते ओळखत नाहीत. त्यांचा ठाव ठिकाणा व पत्ता हे कुणास माहित नाही. काम पडल्यास त्यांना कंदिल घेऊन पहायचे कुठ? त्यांचा ‘रिमोट’ इतर कुणाकडे आहे. भाजपाचे सुमित बाजोरीया हे सर्व परिचीत उमेदवार आहेत.त्यांना यवतमाळ जिल्ह्याचा अभ्यास आहे . जिल्ह्यातीलचं तरुण तडफदार उमेदवार आपल्या जिल्ह्यास लाभला पाहिजे म्हणून सामान्य जनतेच्या प्रतिक्रीया आहेत.
यापूर्वी निवडून गेलेल्या बाहेरील किती उमेदवारांनी तोंड दाखविले. आलेला विकास निधी कुणाच्या घशात घातला हे पाहणे म्हत्वाचे आहे. आजपासून भाजपा ही विकास आघाडीला ‘सावज’ करण्यासाठी सावध झाली आहे . एमआमचे उमेदवार फुटल्याची चर्चा आहे .८ पैकी सहाच उमेदवार काॅग्रेस सोबत आहेत तर दोन भाजपा सोबत आहेत? जिकडे पार्डे जड तिकडे आम्ही .. हा उमूदवारांचा ठुपा सुर आहे. भाजपाने उमेदवार फोडण्यासाठी सुरुवात केल्याने महाविकास आघाडीला आदरा..