पुरुषोत्तम कामठे
यवतमाळ , दि. २२ :- अपंग व्यक्तिना जीवन जगन्यासाठी शासनाने त्यांना योग्य नोकरी व त्याना निर्निराळ्या सोई सुविधा लागू केल्या परंतु या कायद्याचा गैरफायदा सुदृळ व्यक्तींनी घेतल्याचे दिसून येत आहे.
अपंग प्रमाणपत्र देने हे डॉक्टरांच्या डाव्या हाताचा खेळ असल्याने डॉक्टरांशी आर्थिक व्यवहार करून कित्तेक सुदृळ व्यक्तींनी अपंग प्रमाणपत्र मिळवले व त्या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या चांगल्या नोकरी आणि अपंगास मिळणाऱ्या सोई सुविधांचा लाभ सुद्धा घेत आहे.जिल्हापरिषद नगर परिषद शाळांवर रुजू असणाऱ्या शिक्षकां पैकी ५०% शिक्षक बोगस आणि बनावटी अपंग प्रमानपत्राच्या आधारे नोकरी मिळउन शासनाची आणि खऱ्या अर्थाने अपंग असलेल्या अपंग उमेदवारांची फसवणूक करीत आहे. अपंग व्यक्तींचे प्रमाणपत्र नुतनिकरण तथा online करण्याचे शासनाचे निर्देश आल्यावर जे खरोखर अपंग होते त्यानी आपले प्रमाणपत्र निश्चिन्त पने नुतनिकरन आणि online केले परंतु ज्यांचे प्रमाणपत्र बनावटी व बोगस आहे. त्यांच्या पुढे मोठा गंभीर प्रश्न उभा झाला आणि त्यानी आपला भोंगळ कारोभार उघडकीस एण्याच्या भीतीने आपले अपंग पर्माणपत्र अजूनही online तथा नुतनिकरण केलेले नाही.
या बाबत शासनाच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात माहिती असून हे अधिकारी तोंडाला नोटाच्या बंडल चे बुच लाउन गप्प बसलेले आहे.आणि हे अधिकारी सुद्धा शासना सह अपंगाची फसवणूक करीत आहे. या कारणाने अश्या बोगस अपंगाविरोधात लवकरच भव्य आंदोलनाचे वादळ येण्याची शक्यता आहे.