सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २२ :- माध्यम साक्षारता ग्रामीण विकास संस्था बोपापुर (दिघी) च्या वतीने ग्राम पंचायत दिघी येथील सभागृहात मध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी दिघी गावचे सरपंच घनश्याम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर कोरो संघटना मुंबई चे व्यवस्थापक महेंद्र रोकडे, प्रशिक्षक आलोक विभागीय समन्वयक प्रमोद वालदे, दिपक मरघडे, माध्यम साक्षारता संस्थेचे अध्यक्ष विजय पचारे, मेंटर योगेश कांबळे यांची उपस्थिती होती. या मेळाव्या मध्ये युवकांनी आप आपले विचार मांडले, तर माध्यम साक्षारता संस्थेने सामाजिक विषमता दूर करण्याचा उद्देशाने विजन तयार केले त्याची मांडणी संथापक विजय पचारे यांनी केली. कोरो संघटनेचे संचालक महेंद्र रोकडे यांनी व्हिजन पूर्ण करण्यासाठी जो मार्ग अवलंबला पाहिजे त्याची स्पष्टता कार्यकर्ते, संस्था व समुदायाला असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन ससंस्थे फेलो सागर पायघन यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाहक हनु पचारे यांनी. मेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील वाचन संस्कृती चळवळीच्या सुनील ठाकरे, सागर डबले,प्रवीण वाटकर, चेतन येंडे इत्यादी कार्यकर्त्यांनी श्रम घेतले.

