Home महाराष्ट्र घटनेच्या रक्षणासाठी आणि सीएए / एनआरसी / एनपीआर हाणून पाडण्यासाठी…..!

घटनेच्या रक्षणासाठी आणि सीएए / एनआरसी / एनपीआर हाणून पाडण्यासाठी…..!

133

‘आम्ही भारतीय’ या व्यापक मंचातर्फे आणि राष्ट्रध्वजाखाली 23, 26, 30 जानेवारी रोजी माकप चे आंदोलन – डॉ. अशोक ढवळे

मुंबई , दि. २२ :- ( विशेष प्रतिनिधी ) – घटनेच्या रक्षणासाठी आणि सीएए / एनआरसी / एनपीआर हाणून पाडण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ या व्यापक मंचातर्फे आणि राष्ट्रध्वजाखाली 23, 26, 30 जानेवारी रोजी माकप चे आंदोलन होणार असल्याचे पक्षाच्या केंद्रीय कमिटीची महत्त्वपूर्ण हाक दिल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कमिटी द्वारे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले आहे.

यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सेंट्रल कमिटी सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, नुकतेच १७ जानेवारी रोजी, पक्षाचे महान नेते कॉ. ज्योती बसू यांच्या 10 व्या स्मृतिदिनी, कॉ. ईएमएस अकॅडमी, थिरुवनंतपुरम, केरळ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची केंद्रीय कमिटी बैठक झाली. त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय ताबडतोब आम्ही सर्वांना कळवत आहोत. की, भाजप-आरएसएसच्या केंद्र सरकारने सीएए / एनआरसी / एनपीआर द्वारे भारतीय राज्यघटना पायदळी तुडविण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्याला गेला महिनाभर जनता देशभर प्रचंड विरोध करत आहे. सर्व डावे व धर्मनिरपेक्ष पक्ष, जनसंघटना आणि इतर अनेक संघटना व व्यक्ती, आणि या सर्वांच्या परिघाबाहेरील लाखों लोक या आंदोलनात सामील झाले आहेत व होत आहेत. सर्व धर्मजातींचे लोक आणि विशेषतः तरुणाई त्यात प्रचंड संख्येने सामील होत आहे, या दोन बाबी विशेष स्वागतार्ह आहेत. ‘हम भारत के लोग’ किंवा ‘आम्ही भारतीय’ या व्यापक मंचातर्फे आणि राष्ट्रध्वजाखाली हे आंदोलन खूप जास्त सर्वसमावेशक तसेच शांततापूर्ण करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय कमिटीने तीन दिवस ठरवून दिले आहेत. यात 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती – ‘लाल किले से उठी आवाज, सहगल धिल्लो शाहनवाझ’ ही आझाद हिंद फौजेच्या जवानांच्या रक्षणाची तेव्हाची घोषणा हिंदू-मुस्लिम-शीख ऐक्याचे प्रतीक होते. 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन – घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराखाली घटनेत लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे कोरली गेली. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींचा हौतात्म्य दिन – स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी, स्वातंत्र्यलढ्यात काडीचा सहभाग नसलेल्या आरएसएस आणि हिंदू महासभेचा नथुराम गोडसे व त्याच्या सहकारस्थान्यानी स्वातंत्र्य मिळण्याच्या सहा महिन्यांच्या आत राष्ट्रपित्यांचा निर्घृण खून केला. हे तिन्ही दिवस ज्या मूल्यांचे प्रतीक आहेत, त्याच मूल्यांना मोदी-शहा सरकार सीएए / एनआरसी / एनपीआर द्वारे सुरुंग लावत आहे.

पक्षाच्या सर्व जिल्हा नेतृत्वाने संपूर्ण पक्षाला आणि आपल्या सर्व जनसंघटनांना सक्रिय करून ‘हम भारत के लोग’ या व्यापक मंचाच्या नेतृत्वाखाली इतर पक्ष-संघटनांशी ताबडतोब संपर्क साधात आहोत आणि हे तिन्ही दिवस अधिकाधिक लोकांच्या सहभागाने महाराष्ट्रभर प्रचंड प्रमाणात यशस्वी करावेत ही सूचना आम्ही आमच्या कॉम्रेड यांना दिली असून आपल्या पक्ष नेतृत्वाने संयुक्त सभांमध्ये प्रभावी भाषणे करावीत. असे सर्वांना कळविले आहे असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.