Home सोलापुर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील परमेश्वर शिक्षक सोसायटीत सर्व धर्मिय हळदी कुंकूं कार्यक्रम...

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील परमेश्वर शिक्षक सोसायटीत सर्व धर्मिय हळदी कुंकूं कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वैभवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

501

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. २२ :- वागदरी येथील शिक्षक सोसायटी च्या पटागंणात येथील महिला मंडळानी हळदी कुंकूं कार्यक्रमाबरोबरच विविध खेळाचे देखील आयोजन केले होत .अबाल वृध्दाना भाग घेता यावा म्हणुन संगित खुर्ची , गायन स्पर्धा ,नृत्य ,फुगडी अशा अनेक प्रकारचे संपन्न झाले.यात महिलांनी वय विसरून भाग घेतले.व उपस्थिताचे शाब्बासकी मिळविले.सोनाबाई निलगार या ६८ वर्षाचे आजीने उत्कृष्ठ नकला करून लक्ष वेधुन घेतल्या .

प्रारंभी उपस्थित महिलांना हळदी कुंकूं लावुन तिळगुळ देऊन शैलजा मुनोळी ,जयश्री मुनोळी ,गंगुबाई बिराजदार ,सुजाता आष्टगी ,सविता गोगांव ,मलम्मा मठपती यांनी स्वागत केले.
त्या नंतर गावातील पप्पी बडदाळे,सलगरे बाई ,प्रभावती नडगेरी ,सोनाबाई निलगार फुघडी खेळुन नव तरूणीना लाजुन सोडल्या . मनिषा वेदपाठक ,सोनाली हुगार,संगिता पोमाजी , इंगळेबाई,आदीनी संगित खुर्चीचा आनंद लुटला . यावेॆळी जि प प्रा मुलांची शाळेचे मुख्याध्यापक रेखा सोनकवडे ,इंदुबाई वळसंग ,काळेबाई , यमाजीबाई सुरवसेबाई , प्रेमा म्हेत्रे ,नागिनी वळसंग , ललिताबाई कोणजी सह बहुसंख्या महिला उपस्थित होत्या.