
C.B.I कडुन चौकशी ची मागणी…!
अमोल कोमावार
यवतमाळ , दि. २२ :- (प्रतीनीधी) –
नीर्भया , उन्नाव सारख्या प्रकरणामुळे देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस झाल्या आहेत परंतु अशा घटना होण्यामागचं मुख्य कारण जेव्हा शोधल्या जाते तेव्हा प्रशासनाचा तसेच जागृत समाजाच्या दुर्लक्षित पणा यामुळेच किंवा या बाबीला गंभीरपणे न घेण्यामुळे किंवा मदत न करणे हाच प्रथमदर्शनी मुख्यता दिसून येतो.
सविस्तर वृत्त असे की पुसद येथील हनुमान वार्डातील एक विधवा स्त्री तिच्या लहान मुलांसह राहत होती त्याच वार्डातील जगदीश जाधव नावाचा कुख्यात गुंड त्या स्त्रीवर नजर ठेवूनच होता पती – असतानासुद्धा त्याची वाईट नजर त्या स्त्रीवर होती अशातच पती अपघातात वारल्यानंतर आणि त्या स्त्रीला आई – वडील नसल्याचे बघून व सासू – सासरे वेगळे राहात असल्यामुळे या संधीचा फायदा घेत जगदीश जाधव यांनी बलात्काराच्या उद्देशाने घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या स्त्रीने विरोध केल्यामुळे त्या स्त्रीचे कपडे फाडले तेही मुलगी तेरा वर्ष व छोटा मुलगा दहा वर्ष यांच्यासमक्ष तिचे अंतर्वस्त्र फाडले , स्वतःच्या पॅन्टची चेन काढली , आरडाओरडा केल्यामुळे त्या स्त्रीवर बांधकाम करण्यास वापरण्यात येणाऱ्या सेंट्रींग च्या खिळे असलेल्या पाटी ने सपासप हातावर व डोक्यावर वार केले एवढ्यावरच तो थांबला नाही ओरडल्यामुळे सर्व आसपासचे लोक जमा झाले तरी तो अश्लील ,घाणेरडी शिवीगाळ व जीवे जीवे मारण्याच्या धमक्या देतच होता जवळच राहणाऱ्या त्याच्या भाऊ बंधांनी त्याला ओढत घराबाहेर काढले परंतु तो दरवाजाच्या बाहेर निघून घरी जाऊन शस्त्र घेऊन परत आला व “जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाशील तर इथेच मारून टाकेल “म्हणून दरवाजातच उभा राहिला.
रक्ताच्या थारोळ्यात सुन्न पडलेली विधवा स्त्री अतिशय घाबरलेली लहान मुले जगदीश जाधव याच्या दहशतीने आसपासचे मदत न करणारे हात त्यामुळे त्या घटनेची क्रूरता तसेच विध्वंसक वृत्ती , स्त्रीवर होणारा अत्याचार समाज मनाला हेलावून टाकणारी हृदयद्रावक घटना. कशीबशी मुलीच्या सहाय्याने बहिणीला फोनवर बोलण्यात ती यशस्वी झाली व तब्बल दोन तासानंतर पुसद पोलिस घटनास्थळी पोहोचले परंतु घटनास्थळावरून जगदीश जाधव हालला नाही पोलिसांनी सुद्धा भाऊ , “जाऊद्या ना ,राहुद्या ना “असे म्हणून त्याला बाजूला सारले व पीडित स्त्रीला फाटक्या वस्त्रांसह पोलीस स्टेशनमध्ये नेले परंतु पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जगदीश जाधव पहिलेच हजर होता , अर्धा तास तिथे थांबून नंतर वैद्यकीय परीक्षणा करिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथेसुद्धा जगदीश जाधव यांचा बंधू भारत जाधव हजर होता . ही घटना २०१५ सालची आहे त्यानंतर कसेबसे दिवस निघत होते परंतु रात्र वैऱ्याची होती जीव मुठीत धरून दोन्ही लेकरांना पोटाशी धरून ती कसेबसे दिवस काढत होती कुणाचा सहारा कोणाचा आसरा बिलकुलच नव्हता कोणी मदत सुद्धा करायला तयार नव्हते कारण या गुंडाची गेल्या १५ ते २० वर्षापासून समाजामध्ये प्रचंड दहशत पसरली आहे आणि याच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली होती कदाचित ५ वर्षात पहिलीच घटना असेल आणि पहिलीच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याची हिंमत करणारी स्त्री असेल. मोठ्या मुश्किलीने जेमतेम ४ महिन्याचा काळ तेथे काढला त्यातही वारंवार जीवे मारण्याच्या, मुलांच्या अपहरणाच्या अप्रत्यक्षपणे धमक्या येतच होत्या तसेच पोलिसात दिलेली तक्रार वापस घेण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला होता.या सर्व प्रकारामुळे अतिशय तणावात दिवस काढत असताना एक दिवस भारत जाधव व जगदीश जाधव दोघेही मारून टाकण्याच्या बेताने त्या स्त्रीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत होते व तक्रार वापस करण्यासाठी बोलत होते पण ती वेळ अतिशय भयंकर होती प्रचंड दबाव व तनाव निर्माण होऊन काहीतरी अघटित होण्याचे लक्षणे दिसत होते परंतु अर्धा तास प्रचंड तणावा नंतर त्या स्त्रीने सुटकेचा श्वास घेतला कारण तिच्या १० वर्ष मुलाने धावत जाऊन जवळच्या पोलिस स्टेशन मधून पोलिसांना घेऊन आला व तात्पुरते संकट टळलं परंतु पोलिसांना घेऊन आले म्हणून त्या १० वर्षाच्या मुलावर सुद्धा पोलिसांच्या समक्ष जाधव बंधू धमक्या व चिडचिड करत होते त्यानंतर त्या पीडित स्त्रीने रीतसर पोलिस स्टेशनला तक्रार देऊन व त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मला न्याय हवा असे स्पष्ट नमूद करून गाव सोडले.
आज तब्बल पाच वर्षांनंतर पुसद न्यायालयात प्रकरणाची सुनावणी चालू झाली परंतु पीडित स्त्रीला कुठलाही मेसेज किंवा नोटीस दिली नाही मोठ्या मुश्किलने २०/११/२०१९ या तारखेचा पकड वॉरंट न्यायालयाने फिर्यादीच्या नावाने काढल्यामुळे या तारखेवर हजर होण्यासाठी पुसद न्यायालयात जाण्यासाठी पुसदला पोहोचताच तिच्यावर हमला करण्याचा प्रयत्न झाला ,त्यामुळे तिने घाबरून जाऊन पुसद शहर पोलीस स्टेशन गाठले परंतु तिथे तिची तक्रार किंवा तिची आप बीती कोणीही ऐकण्यास तयार नव्हते, तेव्हा ताबडतोब तिने पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे जाऊन सविस्तर लेखी तक्रार दिली व पोलिस संरक्षण मागितले पुढची तारीख २०/१२/२०१९ ला ते पीडित स्त्री पोलिस संरक्षणात पुसद न्यायालयापर्यंत पोहोचली परंतु तेथे गेल्यानंतर बऱ्याचशा बाबी लक्षात आल्या सर्व साक्षी ,पुराव्या मध्ये हेरफेर झालेली दिसली, एवढेच नाही तर न्यायालय परिसरात संरक्षण करते पोलिसांसोबत आरोपी जगदीश जाधव पीडित स्त्रीच्या बाबत चर्चा करताना आढळले ,तेही पीडित स्त्रीच्या मुला समक्ष जगदीश जाधव हा पीडित स्त्री चा पत्ता, कोणत्या गाडीने आणि कुठे जाणार त्याचबरोबर काहीतरी पैशासंदर्भात सुद्धा बोलत होता. कशीबशी पीडित स्त्री मुलासोबत पुसद बस स्टॉप पर्यंत पोहोचली परंतु या दरम्यान संरक्षण करणे पोलिसांचं वागणं संशयास्पद वाटत होतं ,ती पीडित स्त्री आपल्या मुलासह पुसद बसस्थानकावरून औरंगाबाद कडे जाणाऱ्या बस मध्ये बसली आणि तेथून संरक्षण करणारे पोलिस करते निघून गेले मुलाने घाबरत घाबरतच झालेला वृत्तांत सांगितला, लगेच पीडित स्त्रीने त्या बसमधून उतरून यवतमाळ बस मध्ये बसण्याचा निर्णय घेतला व यवतमाळला येऊन पोलिस अधीक्षकांकडे तसेच पुसद न्यायालयाला लेखी तक्रारी ने कळविले परंतु आजपर्यंत जगदीश जाधव या क्रूर करम्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही याचे एकमेव कारण म्हणजे हेतुपुरस्सर या प्रकरणाला भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित करणे.
या सर्व वरील प्रकरणांमुळे पुसद पोलिसांच्या कर्तव्यावर दाट संशय निर्माण झालेला आहे त्यामुळे पीडित स्त्रीने मदतीचा हात म्हणून सर्व संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, स्त्री हक्क व संरक्षणासाठी लढणाऱ्या विविध सामाजिक व राजकीय स्त्री संघटना तसेच समाजातील जागृत सर्वांना असे आवाहन करते की परिस्थितीचे गांभीर्य घेऊन या संदर्भातील सर्व विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचउन तसेच झोपलेल्या प्रशासनापर्यंत आवाज उठवून झालेल्या क्रूर अत्याचाराला दृष्टिक्षेपात आणून आरोपीवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मदत करावी असे जाहीर आव्हान पीडित स्त्रीने केले आहे त्याच बरोबर पुसद येथे जर न्याय मिळाला नाही तर लाखो स्त्रियांसह देशव्यापी आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा एका अर्जाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांना देण्यात आला.