Home सोलापुर सदगुरू रेवणसिध्द शिवशरण मठ

सदगुरू रेवणसिध्द शिवशरण मठ

131

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. २१ :- दि. ५ फेब्रुवारी रोजी विणकर मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती अक्कलकोट तालुका विणकर महिला अध्यक्षा सुनंदा आष्टगी व शिवशरण मठ ट्रस्टचे चेअरमन माणिक निलगार यांनी दिली आहे
विणकरांच्या समृध्दीसाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघ व खादी ग्रामोद्योग ,पंतप्रधान रोजगार निर्मिती आयोजित रोजगार संधी व प्रकल्प अनुदान व अर्थसहाय्य या बाबत मार्गदर्शन व गरजुना मदत करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी रमेश भकरे ,अनिता कांबळे ,सुनिता मेटे,काशिनाथ थिटे,पार्तीबाई नागठाण ,सिध्दारूढ जावळकोटी,ओमशंकर हुलगेरी आदी उपस्थित रहाणार आहेत. राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश व सदगुरू रेवणसिध्द शिवशरण स्वामी ट्रस्टच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

विणकरांच्या उन्नतिसाठी सुक्ष्म .लघु ,मध्यम उद्योग उभारण्यासाठी महा- ई सेवा केद्रांची उभारणी ,विणकरांच्या समृध्दीसाठी समर्थ ,समृध्द स्वाभिमानी भारत .विणकरांच्या उज्वल भविष्यासाठी प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी ५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी २ वाजता शरणमठ वागदरी रोड अक्कलकोट येथे होणा-या या कार्यक्रमास बहुसंख्य विणकर नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.