Home महत्वाची बातमी लग्न मंडपात चाकू हल्ला एकाची हत्या

लग्न मंडपात चाकू हल्ला एकाची हत्या

200

गुन्हा दाखल पाच आरोपींना अटक

अमीन शाह

नागपूर , दि. २१ :- लग्न समारंभ म्हंटलं की धमाल आलीच अश्याच एका लग्न समारंभात डी , जे , च्या तालावर धमाल डान्स सुरू असतांना एक युवकाचा दुसऱ्या युवकाला धक्का लागल्या मुळे लग्न समारंभातच खुनी थरार घडला असून चाकू ने वॉर करून एका ची हत्या करण्यात आली आहे जिथे आनंदोत्सव साजरा केला जाणार होता तिथे दुःख वायकत करण्याची पाळी एका कुटुंबावर आली आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील अमृत लॉन येथे गणेश नंदांवर याच्याकडे लग्न होतं. रात्री 9.30 च्या सुमारास वर पक्ष डीजेच्या तालावर नाचत गाजत लॉनमध्ये पोहोचलं. त्यावेळी वधूकडील काही मंडळीही डीजेवर नाचण्यात सहभागी झाले. अचानक गर्दी झाल्यामुळे तरुणाला धक्का लागला. त्यामुळे वधू आणि वर पक्षात वाद झाला. दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद संपुष्टात आला होता. त्यानंतर लॉनमध्ये लग्नसोहळाही आटोपला होता.
परंतु, मध्यरात्री 12 च्या दरम्यान काही लोकं तिथे आले आणि वर पक्ष आणि वधू पक्षाच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत निखिल लोखंडे हा 26 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या निखिलचा मृत्यू झाला. रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या प्रकरणी कळमना पोलिसांनी वर पक्षांकडील 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.