Home विदर्भ प्रेस संपादक व पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी विजय बुंदेला यांची नियुक्ती

प्रेस संपादक व पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी विजय बुंदेला यांची नियुक्ती

128

यवतमाळ , दि. २१ :- दै. सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी श्री. विजय कुमार रतनचंद बुंदेला यांची प्रेस संपादक व पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ येथील श्री. विजय कुमार रतनचंद बुंदेला हे मागील ३२ वर्षापासून यवतमाळ वर्तमान पत्रकारिता क्षेत्रात बुंदेला अ‍ॅड्स व दै. सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांनी या अगोदर यवतमाळ जिल्ह्यात पत्रकार संघाच्या विविध दुरध्वनी क्रमांक पुस्तकांचे विमोचन केले आहे. त्यांची ही निवड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डि. टी. आंबेगावे सर यांनी केली असून त्यांच्या या नियुक्तीमध्ये संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांची महत्वपूर्ण भूमिका असून श्री. विजय बुंदेला यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला असून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या नियुक्तीचे जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे, अमोल सांगाणी, सविता चंद्रे आदिंनी त्यांचे स्वागत केले आहे.