Home महाराष्ट्र सेक्स रॅकेट चा पर्दाफाश पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या परदेशी मुलींची सुटका

सेक्स रॅकेट चा पर्दाफाश पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या परदेशी मुलींची सुटका

112
0

एका कास्टिंग फिल्म डायरेक्टर सह एकाला अटक

अमीन शाह

मुंबई , दि. २१ :- फिल्मी दुनियेची तरूणाईला भूरळ पडली असून याचाच फायदा काही लोक घेत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत चित्रपटात किंवा एखाद्या मालिकेत काम मिळेल या उद्देशाने आलेल्या तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकासह त्याच्या साथीदाराला समाजसेवा शाखेच्या पथकाने अटक करून तीन मॉडेल व परदेशी मुलींची सुटका केली. महिन्याभरातील ही चौथी घटना असून यामुळे खळबळ उडाली आहे.
नावेद शरीफ अहमद अख्तर (वय-26) आणि नावीद सादीक सय्यद (वय-22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांची महिला साथीदार आणि वेश्या दलाल फरार झाली आहे. ही टोळी चित्रपटात आणि मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने मॉडेल आणि तरूणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. तसेच या मोबदल्यात ते 40 हजार रूपये घेत असल्याचे समोर आले आहे. नावीद सादीक सय्यद हा कास्टिंग डायरेक्टर असून त्याचे आणि त्याचा साथीदार नावेद अख्तर याचे बॉलिवुडशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपी मॉडेल आणि परदेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची तसेच त्यासाठी 40 हजार रुपये घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस हॉटेलमध्ये छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. पोलिसांनी आरोपी वेश्यादलाल नावेद याच्याशी संपर्क साधून डमी ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण –
सुटका करण्यात आलेल्या मुली या तुर्कमेनिस्तान या देशातील असून त्या विद्यार्थिनी आहेत. शिक्षणासाठी त्या शैक्षणीक विसावर भारतात आल्या आहेत. सद्या त्या पुणे येथील महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहेत. या मुली मुंबई येथे शुटींग करीता गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची ओळख आरोपीसोबत झाली.
बॉलीवूडमधील कामासाठी तडजोड
आरोपीने बॉलीवुडमध्ये काम पाहिजे असल्यास तडजोड करावी लागेल. तसेच सद्या एका ब्रँडच्या जाहीरातीचे शुट असून त्याकरीता परदेशी मुलींची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांना शरिरीक संबंध ठेवावे लागतील असे आरोपीने मुलींना सांगितले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुटका – केलेल्या मुलीकडे चौकशी केली असता आरोपी वेश्या दलाल यांने वर्सोवा येथील फ्लॅटवर दोन मुलींना ठेवून घेतले असून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वर्सोवा येथील फ्लॅटवर छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Unlimited Reseller Hosting