Home मराठवाडा स्वताच्या मुलींचे संपन साकार करण्यासाठी सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्यावा – एस....

स्वताच्या मुलींचे संपन साकार करण्यासाठी सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्यावा – एस. टी. सिंगेवार

34
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.२१ :- श्री क्षेत्र मालेगाव तालुका लोहा येथे मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते मेळावा मा. डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा डाकपाल मालेगाव श्री बालाजी फुलारी यांनी खंडोबा देवस्थान मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मार्केटिंग एक्सिकेटीव्ह नांदेड श्री.सुरेश सिंगेवार म्हणाले की प्रत्येक आई व वडिलांची संपन असते की आपली मुलगी खूप शिकून मोठ्या पदावर नौकरी करावी पण हे संपन प्रत्त्यक्षात साकार करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजना चा लाभ घ्यावा असे सिंगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष आणि खंडोबा देवस्थान मधील पुजारी हजर होते.

आरंभी सुरेश सिंगेवार यांनी खंडोबाचे दर्शन घेऊन या मेळाव्यास सुरुवात केली.
पुढे बोलताना सिंगेवार म्हणाले की मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. मुलगी शिकली तरचं देश टिकेल असे आपल्या भाषणात बोलत होते. आज काल कॉलेज, महाविद्यालयातील विध्यार्थीना मोबाईल गेम व मोबाईल चे मोठे व्यसन लागले आहे ते विध्यार्थीनी सोडून आपल्या आई व वडिलांच्या परिस्थितीचा विचार करून पूर्णवेळ अभ्यासात दयावा असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी फुलारी यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार यांनी केले.

Unlimited Reseller Hosting