Home जळगाव २७ व्या दीवसाच्या साख़ळी उपोषणाला सत्तावीस रक्ताच्या बाटल्या देऊन निषेध नोंदविला…!!

२७ व्या दीवसाच्या साख़ळी उपोषणाला सत्तावीस रक्ताच्या बाटल्या देऊन निषेध नोंदविला…!!

478

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २१ :- मुस्लिम मंच तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवार २७ वा दिवस होता या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करून २७ रक्त बॉटल रेड प्लस रक्त पेढ़ी ला देऊन भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन पी आर चा निषेध नोंदविला.
सत्ताविसाव्या उपोषणाची सुरवात जैनुद्दीन शेख मेहबूब यांच्या पवित्र कुराण पठाणाने करण्यात आली तर सांगता आयाज अली यांच्या दुआँ वर झाली.

रक्तदान शिबिर घेऊन निषेध…

“सभी का खून शामिल है यहा कि मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान नही है”
या शायरीच्या ओळी ला धरून जळगाव मुस्लिम मंचने हे रक्तदान शिबिर घेतले कारण भारत स्वतंत्रता साठी आमच्या पूर्वजांनी व मौलवींनी जो जीव देऊन स्वतंत्रता मिळवली आहे त्यामुळे यात आमच्या समाजाचे सुद्धा बलिदान असल्याने आम्ही आज पुनश्च आमचे रक्त देऊन या सरकारचा निषेध करितो की त्यांनी भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन पी आर रद्द करावा अशी एक मुखी मागणी करून रक्तदानाला सुरुवात केली २६ पुरुषांनी व एक महिलांनी रक्त देऊन सत्ताविसाव्या दिवशी २७ रक्ताच्या बाटल्यांचे रेड प्लस ब्लड बँक यांच्या माध्यमाने हे शिबिर उपोषणस्थळी घेण्यात आले

भील पूरा व तांबापुरा येथील महिलांचा उपोषणात सक्रिय सहभाग….!
२७ व्या दिवशी तांबापुरा व भिलपुरा येथील महिलांनी उपोषणात सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला. त्यात प्रामुख्याने ८० वर्षीय आलीशान बी या वृद्धाने अत्यंत कठोर शब्दाने भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा त्रीव शब्दात धिक्कार नोंदविला. शगुफ्ता नियाज अली यांनी अत्यंत मुद्देसूद माहिती विशद केली ,आबेदा बी व सईदा बी यांनी आपल्य गीताद्वारे निषेध नोंदविला फारुक शेख ,आयाज अली, रउफ़ खान, हाजी सईद, शरद पाटील, अजहर खान, अलफ़ैज़ पटेल, वसीम अय्यूब, पियुष पाटील, हामिद जनाब, अकील पठाण यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

रक्त दान करणारे दाते – प्रतिभाताई शिंदे , मोहम्मद रईस, पिंजारी अझहर हुसेन, शेख रज्जाक ,अलफ़ैज़ पटेल, जावेद खान सिकलीगर,अनिस अहमद, मुजम्मिल कुरेशी, सय्यद कैफ, नदीम काझी, ताहेर शेख, सचिन धांडे, अनिल पाटील, प्रेमचंद व्यास, शरद पाटील, रईस शेख, अल्ताफ शेख, हारून शेख, सलीम शेख, परवेज पठाण, अकील पठान,नदीम मलीक, सलीम खान आदींनी रक्तदान करून या शासनाचा धिक्कार केला.