पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नांदेड , दि. २१ :- बि एससी नर्सिंग, जि.एन.एम, ए.एन.एम, पास झालेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्यसेवक सेवीकाचे इंडियन नर्सिंग काॅन्सील मध्ये रजिस्ट्रेशन नाव नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आवश्यक आहे.
सदरील नोंदणी नांदेड येथे द प्राइम नर्सिंग अॅकडमी बिके हाॅल समोर सुरू असल्याची माहिती अॅकडमीचे संचालक अरविंद कनगीरे, संदीप कोल्हे ( जिल्हा सरचिटणीस ) ,
आनंद घोडके (जिल्हा संघटक) यांनी दिली.
नर्सिंग मध्ये बहुचर्चित व राष्ट्रीय पातळीवर नोकरी करीता आय.एन.सि चे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे, नर्सिंग मध्ये सदरील कॅम्प चा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णाच्या खाजगी नर्सेसच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारी एकमेव संघटना रुग्ण हक्क परिषद नांदेड जिल्हा च्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.
सदरील रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे.