Home बुलडाणा सीएए व एनआरसी विरोधात शेगावात तहसील समोर धरणे..

सीएए व एनआरसी विरोधात शेगावात तहसील समोर धरणे..

174

तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समितीचे आयोजन..!!

अमीन शाह

शेगाव , दि. २१ :- राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) विरोधात शेगावात तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती, व इतर राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समितीसह इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकार्त्यांनीही सहभाग दर्शविला.

राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) विरोधात संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरुच आहे. दरम्यान,सोमवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजे पासून ४ वाजे पर्यंत तहाफ्फुज ए शरियत, संविधान बचाव समिती आणि शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेगावात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर भव्य अश्या मंडपात या धरणे आंदोलनात शहरातून समितीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांचे १ हजाराच्या वर नागरिक सहभागी झाले होते. सायंकाळी चार वाजता नायब तहसीलदार भागवत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती,यांनी आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारिप बहुजन महासंघ, बहुजन वंचित आघाडी च्या शहर व तालुका शाखेच्या पधाधिकाऱ्यांची रामोठ्या संख्येने उपस्थिती होती.