Home मराठवाडा मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार

मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार

124

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / लोहा , दि. २१ :- लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेचा डाक महामेळावा जनतेच्या दारी कार्यक्रम मा. डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत व साहयक डाक अधीक्षक श्री.संजय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा डाक पाल माळाकोळी यांनी आयोजित केला होता.याकरीता मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन सुरेश सिंगेवार यांनी केले.


मेळाव्यास मार्गदर्शन करताना मार्केटिंग एक्सिकेटीव्ह मुख्य पोस्ट ऑफिस नांदेडचे सुरेश सिंगेवार म्हणाले की ,तुम्हाला जर लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणजेच सुकन्या समृध्दी खाते योजना आहे. कारण लक्ष्मी म्हणजे पैसा, सरस्वती म्हणजे शिक्षण, दुर्गा म्हणजे शक्ती या तिन्ही शक्ती एकत्र म्हणजे मुलीची योजना सुकन्या समृध्दी खाते योजना आहे.
मी भाग्यशाली आहे कारण देव सर्वांना घर देतो पण देवाचे घर बांधणारे शिल्पकार यांच्या गावात येऊन मी बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची सर्वानी पुढे आले पाहीजे.असे मत सुरेश शिंगेवार यांनी मांडले.
या कार्यक्रमाला माळाकोळी चे सरपंच श्री चंद्रमुनी जळबाजी मस्के,सत्यमेव जयते मधील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव केंद्रे, आईनाथ सोनकांबळे होते.
पुढे बोलताना सिंगेवार म्हणाले की शून्य ते दहा वर्षा पर्येंतच्या मुलींच्या आई व वडिलांनी सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्यावा कारण आपल्या मुलींच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिस आपल्या दारात येऊन या योजनांची माहिती देत आहेत .या योजनेत गावातील सर्व मुलीच्या आई व वडिलांनी लाभ घ्यावा.

प्रत्येक मुलींच्या आईला माझी मुलगी शिक्षण घेऊन डॉ,इंजिनिअर, पायलट, अधिकारी होण्याचे सपना दरोजचे पाहाते ते पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते उघडून आपले व आपल्या मुलीचे संपन पूर्ण करा असे आपल्या भाषणात मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गावातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला नांदेड टीम मधील माळाकोळी शाखा डाकपाल एम एस होनमोडे,बी. ऐन.तेलंग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याआईनाथ सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन खंडू मेकाले यांनी केले आहे.