शरीफ शेख
रावेर , दि. २१ :- जळगाव बागवान जमात चे सामूहिक विवाह सोहळ्या प्रसंगी ईकरा युनानी मेडिकल कॉलेज व बागवान जमात जळगांव. यांच्या तर्फे ईकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे मोफत आरोग्य शिबीर व पल्स पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीर चे उदघाटन मा. पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सगीर शेठ,जिया बागवान,पवन सोनवणे,अ. मजीद जेकरिया शेठ,अ. करीम सालार,अमीन बादलीवाला,फारूक अहेलेकार, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अ. कूदुस,उप प्राचार्य डॉ.शोएब शेख उपस्थित होते.
मा. पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की असे उपक्रम हे नेहमी करण्यात यावे रुग्णसेवा हेच ईश्वरसेवा आहे.असे आरोग्य शिबीर या कॉलेज कडून नेहमी होत असतात.त्यात रुग्णाची रक्त लघवी व फिजिओथेरपी केली जाते ही आनंदाची गोष्ट आहे. मी यांचे मनापासून कौतुक करतो व असे आरोग्य शिबीर हे घेत राहावे.या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य यांनी युनानी पद्धती व त्यांच्या औषधी व उपचार यांची माहिती सांगितली व युनानी औषधी ही आरोग्यास कोणत्याही प्रकारे हनिकारे नाही या औषधीने आजार हे मूळा पासून बरे केले जाते.या आरोग्य शिबिरात मधुमेह, पांढरे डाग, संधिवात, काविळ, या आजारांवर रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.कॉलेजच्या फिजिओथेरपी विभाग कडून पाठ दुखी, मणक्याचे आजार व असे विविध आजारांवर फिजिओथेरपी करण्यात आले.डॉ. रिजवान खाटीक यांनी फिजिओथेरपी वर मार्गदर्शन केले व रुग्णांवर उपचार केले. या आरोग्य शिबिरात एकूण ११५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वते साठी हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.