Home विदर्भ कारंजा शहरात संत भगवानबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

कारंजा शहरात संत भगवानबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

28
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

वाशिम / कारंजा (लाड) ,दि. २१ :- वंजारी समाजाचे आराध्य दैवत तसेच आध्यात्मिक माध्यमातून सर्व समाजाला दिशा देणारे संत श्री भगवानबाबा यांच्या ५५ वा पुण्यतिथि सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ह्या पुण्यतिथी सोहल्याचे आयोजन स्थानिक प्रशांत नगर मधील मुंगसाजी महाराज सभागृहात १८जानेवारी 20 रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानीकरावजी गंगावने सर मंगरुलपीर, अजाबरावजी घुगे,रामकृष्णजी मिसाळ, शिवाजी राव चौधरी,पीएसआय गणेशराव कायंदे, आदिंची उपस्थिति लाभली होती. सर्वप्रथम संत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्व गोपीनाथजी मुंडे यांच्या व भगवानबाबा च्या प्रतिमेला हरार्पन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानीकरावजी गंगावने सह संत भगवानबाबा बद्दल आपपली मनोगते व्यक्त केलित व वंजारी समाज एकसंघ करण्याची आजची काळाची गरज का आहे हे समाजबांधवाना पटवून दिले व वेळो वेळी असे समाज प्रभोधनात्मक कार्यक्रम होत राहावे असे प्रतिपादन केल व कार्यक्रमाच्या शेवटी महिलाचा मकर संक्रांति निमित्य तीळ गुळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महाप्रसादा ने कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला समाजातील 100 % समाज बांधवाची उपस्थिति होती कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा संतोष कुटे यानी मांडली तर संचालन राजेन्द्र खाडे यानी केले व आभार संतोष वाघ यांनी मानले.

Unlimited Reseller Hosting