Home मराठवाडा मंगळवारी साई जन्मस्थान मंदिरात महाआरती , “जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक”

मंगळवारी साई जन्मस्थान मंदिरात महाआरती , “जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक”

222

प्रतिनिधी – पाथरी

परभणी , दि. २० :- येथील श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर कृती आराखड्या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्या नंतर शिर्डी करांनी वाद निर्माण केल्या मुळे मंगळवारी पाथरीत परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,व्यापारी, यांची बैठक आणि श्रीसाईबाबांची महाआरती होणार असल्याची माहिती जन्मस्थान मंदिर कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

पाथरी शहरातील श्रीसाईबाबांच्या जन्मस्थान मंदिरा साठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करताच शिर्डी करांचा तिळपापड झाला. शिर्डीचे महत्व कमी होईल या भावनेतून काहिंनी याला विरोध करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत शुक्रवारी शिर्डी बंद केली.त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चे साठी शिर्डीकरांना निमंत्रण देत बंद मागे घेण्याचे आवाहन केल्या नंतर रविवारी रात्री बारा वाजता बंद मागे घेतला. त्या मुळे आता. परभणी करांनी करांनी कंबर कसली असून काल पाथरीच श्रीसाईबाबांचे जन्मस्थान असल्याचे पुरानातील २९ पुरावे दिले होते. तर खा संजय जाधव यांनी ही भजन आंदोलन केले होते. तर साईजन्मस्थान मंदिर कृती समितीचे अध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी यांनी ही निधी नाही मिळाला तरी हरकत नाही पण पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची भूमीका जाहिर पणे माध्यमात व्यक्त केली होती. आता पुढील वाटचाली साठी पाथरी येथे मंगळवार २१ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील
सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी,व्यापारी यांची बेठक सकाळी दहा वाजता होणार असून त्या नंतर साईंची महाआरती होणार आहे. या वेळी पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.