Home बुलडाणा पोलिसांनी नकली नोटांसह दोघांना केले जेरबंद …!

पोलिसांनी नकली नोटांसह दोघांना केले जेरबंद …!

27
0

दोन लाख 92 हजार रुपये च्या बनावट नोटा जप्त…!

अमीन शाह

बुलडाणा , दि. २० :- बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीती नोटांसह दोघांना पकडले व २ लाख ९२ हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. सदर कारवाई सोमवारी दि.२० रोजी करण्यात आली मोताळा-मलकापूर मार्गावरील नाकाबंदी करून नळगंगा फाट्यानजीक आरोपींना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. व बोराखेडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पीएसआय अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात सोमवारी पहाटे च्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा.
जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले
२ लाख ९२ हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या त्यांना थांबवून चौकशी केली. दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, दोघांच्या खिशातून भारतीय चलनातील २ हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा (दर्शनी किंमत २ लाख ९२ हजार रुपये), पाचशे रुपयांच्या ५ नोटा २हजार ५०० रुपये व दुचाकी (किंमत ४० हजार रुपये), ३ मोबाईल किंमत ७ हजार रुपये) असा एकूण ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींनी भारतीय चलनातील नकली नोटा उपयोग करण्यासाठी ताब्यात ठेवल्या होत्या.बोराखेडी पोलिसांनी दोघं आरोपींना अटक केली असून दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जंजाळ करीत आहे त्यांनी या बनावट नोटा कुठून कोना कडून आणल्या ते या नोटा कुठे चालवण्यासाठी आणत होते या बाबींचा उलगडा पोलीस तपासात लवकरच होणार असून यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.

पोलिसांचं माहिती देण्यास विलंब का ?

कल रात्री 2 वाजेच्या च्या सुमारास बोरखेडी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली होती मात्र आज सोमवार रात्री 7 वाजे पर्यंत स्थानिक पत्रकारांना माहिती देण्यात आली नाही , पोलिसांनी एवढी मोठी कार्यवाही केली असतांना ही पत्रकारांना माहिती दिली नाही त्या मुळे स्थानिक पत्रकारात नाराजी वयकत केली जात आहे .