Home मराठवाडा गब्बर ॲक्शन कमिटीच्या राखी संसार पळशी रोड येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न…!!

गब्बर ॲक्शन कमिटीच्या राखी संसार पळशी रोड येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न…!!

24
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २० :- महानगरपालिका निवडणूक 2020 गब्बर एक्शन कमिटी मैदानात गब्बर एक्शन कमिटी औरंगाबादच्या वतीने राठी संसार पिसादेवी रोड अब्रार कॉलनी या ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज रोजी कमिटीचे अध्यक्ष मकसूद भाई अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्व विधानसभा मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी गब्बर ॲक्शन कमिटीच्या वतीने या नूतन कार्यालयाचा आजपासून लोकार्पण सोहळा करण्यात आला पुढील काळात पूर्व विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन गब्बर एक्शन कमिटी त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल कार्यालयाच्या उद्घाटनानंतर या परिसरातील रहिवासी शेख जहीर पटेल यांची पूर्व विधानसभा शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली निवडीचे पत्र देताना मौलाना अनीसुर रहेमान, गब्बर ॲक्शन कमिटीचे संस्थापक अध्यक्ष मकसूद भाई अन्सारी, इंगळे सर ,उपाध्यक्ष हफीज अली, कार्याध्यक्ष इम्रान पठाण, जिल्हाध्यक्ष हसन शहा, विलास मगरे, शेख मुख्तार, फिरोज पटेल, मोसिन सर, लतीफ खान, शेख मोसिन, फारुख शहा, आयुब खान, अनिस रामपुरे, जावेद पटेल आदींची यावेळी उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting