पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नागपुर , दि. १९ :- महाराष्ट्र पोलिसांच्या समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री मा.अनिल देशमुख साहेब यांना आज दिनांक 18/1/2020 रोजी सकाळी 9.30 वाजता फाेन केला असता यांनी आज सायंकाळी नागपूर विमानतळावर भेटायला या राञी 9.15 वाजताच्या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस समस्या ऐकून घेतल्या व मी चर्चेसाठी वेळ मागितला असता त्यांनी दि. 25/1/2020 यी तारखेला निवांत नागपूरच्या घरी या विषयांवर चर्चा करून समस्या सोडविण्यावर भर देऊ असे सांगितले.
तर गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या समस्यांचे निराकरण करणे हे माझे मुख्य काम असल्यामुळे आपण सविस्तर चर्चा करूनच हा विषय सोडवू असे त्यांनी मला आश्वस्त केले ,जे काम मागील सरकारने केले नाही ते सर्व कामे आपलेला पार पाडायचे आहे असे साहेब बोलले , साहेबांचे नागपूरचे पीए योगेश काेठेकरही तेथे हजर होते, अत्यंत साधे आणि मनमिळाऊ, कामाच्या प्रवृत्तीचे त्यांचे पीए आहे. सतत संपर्कात राहून कामे करून घ्या असा साहेबांनी सल्लाही दिला, तुम्ही पोलिसांसाठी चांगले काम करता असे म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझे अभिनंदनही केले .
मितभाषी मनमिळाऊ , आणि गृहमंत्री म्हणून कुठलाही अहंकार नसलेले साधी राहणी पण उच्च विचारसरणी असलेले गृहमंत्री महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने लाभले आहेत हे साहेबांच्या वागण्यामुळे मला प्रथमदर्शनी दिसले आहे.. सायबांची कामाची ऊर्जा पाहून मला शंभर टक्के खात्री आहे कि पोलीस विभागाचे कामे शंभर टक्के मार्गी लागणार , साहेबांच्या भेटीला डॉक्टर आशिष अटलोये, नीतीन वजेकर, गौरव तिजारे, सौरभ माराेडकर हेही हजर हाेते.