Home जळगाव खिर्डी येथील पाटील विदयालयातील विदयार्थानी केली पाणी ,अन्न, वीजची बचत

खिर्डी येथील पाटील विदयालयातील विदयार्थानी केली पाणी ,अन्न, वीजची बचत

196

खिर्डी येथील शिक्षक प्रविण धुंदले यांचा स्तुस्त्य उपक्रम…

शरीफ शेख

रावेर , दि. १९ :- लहान पणापासुनच विदयार्थी यांना प्रत्येक गोष्टीची बचत करण्याची सवय लावणे व ती अंगीकारणे आवश्यक असते. त्यामुळे काळानुरूप प्रत्येक गोष्टीची बचत केल्यास भाविप्यात अडचण येत नाही मग ते पाणी असो विज अन्न पेट्रोल डिझेल किंवा शैक्षणिक साहीत्य याच धरतीवर मुलांमध्ये बचतीची सवय लागावी म्हणून इयत्ता पाचवी च्या हिदी पाठयपुस्तकात प्रथम सत्रात बचत पाठ आहे. त्यामुळे बचत पाठ हा पाठ शिक्षक प्रविण धुंदले यांनी शिकवलाच नाही ,तर प्रत्येक विदयार्थाला बचत करण्यास सांगीतले त्यामुळे तीन महीण्यानंतर वर्गातील प्रत्येक विदयार्थाना हा उपक्रम दिला . विदयार्थाना फक्त पाठ शिकवण्या पेक्षा त्यांनी हया पाठातुन कितपत कृती केली. हे पडताळून पाहिले असता वर्गातील साठ विदयार्थानी पाणी ,बचत अन्न, विज ,वहया, पैसे यांची बचत केली . आणि ती प्रत्यक्ष आमलात आणली . असंख्य विदयार्थानी आपल्या नळांना तोटया लावल्या . तसेच घरच्या परीसरात पाणी बचती चे महत्व पटवून दिले. अनेक विदयार्थी घरी पाहुणे आले म्हणजे खाऊला पैसे दयायाचे हे विदयार्थी सरळ दुकान गाठून खाऊ खायचे. पण बचत पाठ शिकल्या पासुन त्यांनी स्वता पैसे बचत करून स्वता चा गल्ला केला . तर अनेक विदयार्थानी विजेचा वापर पाहीजे तीतकाच केल्याने विज बील कमी आले. बरेच विदयार्थी वहया वर रेघोटे मारून पाणे फाडायची पंरतु बचत पाठ शिकल्या पासुनवहयाची पाणे फाडण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहीती प्रत्येक विदयार्थानी दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने बचत हा पाठ विदयार्थी फक्त शिकलेच नाही. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीची बचत अंगीकारली या उपक्रमा बाबत बचतीचे महत्व विदयार्थाना समजले त्यामुळे जीवनात बचतीचे महत्व कीती असते हे त्यांना कळले. या उपक्रमासाठी अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विदयालयातील शिक्षक प्रविण धुंदले मुख्याध्यापक पी एस चौधरी पर्यावेक्षिका कीर्ती महाजन यांचे मार्गदर्शन विदयार्थाना बचत बाबत महत्वपूर्ण ठरले.

पाणी बचतीचे महत्त्व मला बचत पाठातुन कळले . त्यामुळे आमच्या नळांचे खुप पाणी वाया जायचे . पंरतु मी स्वता नळाला तोटी लावल्याने पाण्याची बचत झाली पाणी पीण्यासाठी ग्लॉसात पाहीजे तेवढेच पाणी मी घेते.
माहेश्वरी पाटील विदयार्थीनी इयत्ता पाचवी

पुर्वी कोणी घरी पाहुणे आले की मला पैसे दयायचे पण मी सरळ दुकानात खर्च करायची . पण बचत पाठ शिक्षकांनी शिकवल्या पासुन मी गल्ला करून पैसे साठवून ठेवून हया पैशातुन शिक्षणासाठी साहीत्य खरीदी ला ते कामी येतील. त्यामुळे बचतीचे महत्व कळले.
श्रुती धुंदले विदयार्थीनी

माझ्या घरात कोणी नसतांना सुद्धा टीव्ही पंखा टयुबलाईट सुरू ठेवून आम्ही बाहेर खेळायचो पण बचत पाठ शिक्षकांनी शिकवल्या पासुन वीज वाचविणे गरजेचे आहे त्यामुळे घरात पाहीजे तेवढी च वीज वापर करते त्यामुळे पूर्वी पेक्षा कमी विजबील आले.
सेजल हंबंर्डीकर विदयार्थीनी

अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे आणि अन्न बचत केली पाहीजे हे आम्ही बचत पाठातुन शिकलो पूर्वी जेवतांना भरपुर अन्न घ्यायचो व ते फेकून दयायचो पण आता पाहीजे तेवढेच अन्न घेतो त्यामुळे अन्नाची खुप बचत होते.
अथर्व नेहते विद्यार्थी.