Home पश्चिम महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट” स्पर्धेत छोट्या श्रवण लावंड ची चमकदार कामगिरी.!

पिंच्याक सिल्याट” स्पर्धेत छोट्या श्रवण लावंड ची चमकदार कामगिरी.!

244

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. १८ :- दुसऱ्या वेस्ट झोन “पिंच्याक सिल्याट” स्पर्धेत छोट्या श्रवण लावंड ची चमकदार कामगिरी
मध्यप्रदेश पिंच्याक सिल्याट असोसिएशन च्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या वेस्ट झोन चॅम्पियन स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील दरुज च्या श्रवण लावंड या छोट्या विद्यार्थ्यांने सुवर्ण पदक पटकावले.

दि 10 व 11 जानेवारी रोजी देवास, मध्यप्रदेश येथील श्रीमंत तुकडोजी पवार स्टेडियम मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.मध्यप्रदेश बरोबरच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा,दमण आदी ठिकाणचे स्पर्धकानी यामध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत श्रवण लावंड याने टंडिंग फाईट व तुंगल अशा दोन्ही खेळ प्रकारात आपलं वर्चस्व राखत सुवर्ण पदक पटकावले. श्रवण ला भारतीय पिंच्याक सिल्याट
फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले,अनुज सरनाईक, अंशुल कांबळे , ओमकार अभंग, बिरज रावत,मुस्कान मुलाणी, शिवराज वरे, प्राजक्ता जाधव आदी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. छोट्या श्रवण च्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.