Home महत्वाची बातमी एक हजार आदिवासी व गरीब मुलीना सुकन्या समृध्दी खाते योजना पुस्तक मोफत...

एक हजार आदिवासी व गरीब मुलीना सुकन्या समृध्दी खाते योजना पुस्तक मोफत भेट स्वरूपात देणार – जि. प.सदस्य श्री विशाल जाधव

134

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / सारखणी , दि. १६ :- दि. १४ रोजी डाक विभाग नांदेड व महिला सरपंच सो. वनमाला तोडसाम यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत निमित्ताने गरीब मुलींच्या आईला वाण म्हणून १४ सुकन्या समृद्धी खाते पुस्तक भेट मुलीच्या आईला देऊन मकरसंक्रांत साजरी करणारी राज्यातील पहिली प्रधम नागरिक बनली आहे. आदिवासी महिला सरपंच यांनी डाक विभागाचा उपक्रम राबवून गरीब मुलीला या मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनाच्या मुख्यधारेला जोडण्याचे काम सो.वनमाला तोडसाम यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य श्री. विशाल जाधव हे होते. यांनी या संस्कृतिक कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना म्हणाले की मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना मोहिमे अंतर्गत माझ्या उमरी बाजार सर्कल मधील गरीब,आदिवासी, व दारिद्र रेषेखालील कुटूंबातील एक हजार सुकन्या समृध्दी खाते शून्य ते दहा वर्षा पर्येंतच्या मुलींच्या नावे उघडून मी स्वता व्ययक्तिक पहिला हापता भरून पुस्तक मुलीच्या आईवडिलांना याचं महिन्यात ही भेट कन्यादान स्वरूपात देण्याचे मिशन बालिका शक्ती ला मार्गदर्शन करताना जि. प.सदस्य मा. श्री.विशाल जाधव यांनी आज त्यांनी जाहीर केले आहे. पुढे बोलताना जाधव म्हणाले की डाक विभागातील अधिकारी अभिनव सिन्हा व सुरेश सिंगेवार हे सतत किनवट व माहूर आणि मांडवी भागातील वाड्या तांड्यात जाऊन हा उपक्रम राबविले तसेच रेल्वेतील भेळ विक्रीवाले, पाणि बाटली विकणारे व तुतीयपंथी यांचे खाते रेल्वेत प्रवास करताना उघडले जातात हे वर्तमानपत्र तुन नेहमीच बातम्या वाचविण्यास मिळत आहेत या बदल डाक टीम चे व डाक अधीक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
हा कार्यक्रम जि.प.प्रा.शाळेच्या पटांगणात भव्यदिव्य आयोजित करण्यात आला होता.
श्री.जाधव म्हणाले की ही भारत सरकारची योजना मुलीच्या लग्नासाठी, उच्च शिक्षणासाठी व उजवलं भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे नागरिकांनी आपल्या मुलींच्या कल्याणकारी योजना चा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

तसेंच बेटी पढावं बेटी बचाव, सुकन्या समृध्दी खाते योजना रॅली मोठ्या संख्येने जी.प.प्रा. शाळा व आदिवासी आश्रम शाळेतील विध्यार्थी व शिक्षक,शिक्षिका, गावातील सरपंच , सदस्य , डाक कर्मचारी व अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी भाग घेऊन विशाल रॅली काढण्यात आली होती.

या रॅली मध्ये बेटी है तो कल है!,मुलगी वाचवा देश घडवा,बेटी बचाव बेटी पढावं,सुकन्या समृध्दी खात्याचा लाभ घ्या.आशा घोषवाक्यने संपूर्ण सारखणी गाव हादरून गेले होते.ही रॅली जि. प. प्रा. शाळेतून पेट्रोल पंप पासून नंतर शाळेत आल्या नंतर जिजामाता व स्वामी विवेकानंद फोटोची पूजा व हार अर्पण विशाल जाधव व सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नंतर गावातील महिला सरपंच सो.वनमाला तोडसाम डाक विभागाची सुकन्या समृध्दी खाते योजना मुलींच्या शिक्षणासाठी व तिच्या उजवल भविष्यासाठी लाभ दायक आहे.मी या योजनेचा अभ्यास करून १४ गरीब मुलींच्या आईला सुकन्या समृध्दी पुस्तक मकरसंक्रांतीचे वाण म्हणून भेट दिली आहे. असे आपल्या अध्यक्ष भाषण करताना सांगितले. या संस्कृतीक डाक विभागाच्या सुकन्या समृध्दी कार्यक्रमात शाळेतील बाल कलाकार यांनी नववारी घालून व बंजारा वेशभूषा व पोशाख घालून मोठ्या भाग घेतला होता.
या मध्ये जिजाबाई ची भूमिका कु. दुर्गा दत्ता इजगिरवार हिने केलं तर सावित्रीबाई ची भूमिका कु.कोयल संजय राठोड हिने केलं तर पिगां या गाण्यावर डान्स कु.हार्षदा कांबळे, कु.दुर्गा इजगिरवार,कु. स्वेता भवरे, कु.कार्तिका आंबटवार, कु.प्रज्ञा हनवते, कु. चैतन्या मोतेराव, कु.कोयल राठोड,कु.पायल चव्हाण या गाण्यावर डान्स करून सर्वाचे मने आकर्षित केले तर बेटी युग सादर करण्यात आले होते या मधील बाल कलाकार कु.श्रध्दा कांबळे, कु.स्नेहा कांबळे, कु. मोहिनी टेकाम,कु.महावेशवरी शेडमाके, कु.संध्याराणी तोडसाम, कु.नाजीमा शेख, दिपक राठोड, शिलरत्न देवतळे, प्रतीक ब्राहामने,रोहित राठोड, साईनाथ इजगिरवार, यांनी हे गीत गायले व नृत्य केले हे नृत्य सादर करण्याकरिता जि. प.शिक्षिका व शिक्षकाला वेशभूषा, मेकअप ,तारेवरची कसरत करावी लागली या मध्ये श्रीमती एस. व्ही. वळसगणकर,श्रीमती एल. जी.गोपळवार,श्रीमती मुनेशवर जे. व्ही. श्री. आनंदा बोतावार,श्री.रमेश पवार, श्री. नरेंद्र कळंबे,भाऊराव उमरे यांनी सहकार्य केले.
या मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेला जोडण्यासाठी गावातील श्री.लक्षीमन मिसेवार,श्री. बाबूसेठ,श्री. नारायण सांगळे, श्री. भीमराव महाजन, श्रीमती करिष्मा भरणे बँक सखी,अनिता गायके गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच डाक कर्मचारी रोशन भालेराव, मुनेशवर, पोस्ट मास्तर मांडवी,वैभव मोरे,गोपणे,मोरे निराळा बीओ,रमेश राठोड सारखणी, डाक टीम मधील कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी डाक विभागाच्या वतीने सर्व बाल कलाकारांना व लेझीम कलाकार यांना शालेय साहित्य वही व पेन सत्तर विध्यार्थीना डाक निरीक्षक श्री.अभिनव सिन्हा हस्ते वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रमेश पवार सर केले तर आभार प्रदर्शन डाक विभागाचे सुरेश सिंगेवार यांनी सर्वाचे डाक विभागाच्या वतीने आभार मानले.