Home महत्वाची बातमी रेहकी येथील युवक अपघातात ठार , एक जखमी.!

रेहकी येथील युवक अपघातात ठार , एक जखमी.!

28
0

सौ.पदमाताई प्र.मुंजेवार

रमणा पेट्रोल पंपाजवळील घटना.

वर्धा , दि. १६ :- पेट्रोल भरण्यासाठी भारत पेट्रोल पंपावर जात असतांना वर्धेकडून येणाऱ्या इंडिका कारणे समोरून धडक दिल्याने रेहकि येथील युवक किशोर शंकरराव शिंदे उर्फ( बापू) वय 45 व नागो चापले वय 38 हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्नाळयात नेतांना एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नजिकच्या रेहकी येथील किशोर उर्फ बापू शिंदे व नागो चापले हे हिरो होंडा पॅशन गाडी क्रमांक एम एच 32 यु 4497 ने सेलू कडून पेट्रोल भरण्यासाठी रमणा येथील भारत पेट्रोल पंपावर जात असतांना वर्धेकडून भरधाव येणाऱ्या इंडिका कार क्रमांक एम एच 32 एएम 5399 हिने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातील किशोर शिंदे याला नागपूर येथे तर नागो चापले याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात येत असताना किशोर शिंदे याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर नागो चापले याच्यावर सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

Unlimited Reseller Hosting