Home महत्वाची बातमी ऐन सणासुदीच्या दिवसीच बाळाचा हौदात बुडून मृत्यू ठाकुर वाडीत पसरली शोककळा.

ऐन सणासुदीच्या दिवसीच बाळाचा हौदात बुडून मृत्यू ठाकुर वाडीत पसरली शोककळा.

182
0

लक्ष्मण बिलोरे

जालना , दि. १६ :- जिल्हा अंबड तालुक्यातील ठाकुरवाडी येथील गजानन काळवणे यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.ही घटना ऐन संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. शिव गजानन काळवणे असे मृत्यू पावलेल्या बाळाचे नाव आहे. सायंकाळी संक्रांतीच्या दिवशी महीलांची हळदी कुंकवाची लगबग, चालू असताना शिवची आई देखील व्यस्त होती . शिव घराबाहेर असलेल्या हौदाजवळ खेळत होता.हौदा शेजारी असलेल्या दगडावर शिव उभा असतानाच त्याचा तोल जाऊन तो त्या पाण्याने भरलेल्या हौदात पडला असावा आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.शिवच्या आईच्या लक्षात आले की तो बाहेर आहे , अजून आला नाही.

शोधाशोध केली असता शिव हौदात पडला असल्याचे दिसून आले.त्याच वेळ शिवला ताबडतोब पाचोड येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून बाळाला मृत घोषित केले.