Home महत्वाची बातमी भावाने केली भावा ची दगडाने ठेचुन हत्या

भावाने केली भावा ची दगडाने ठेचुन हत्या

54
0

आरोपी फरार

मुख्तार सागर – मंगरूळपीर

वाशिम , दि. ११ :- तालुक्यातील सेलू बाजार रस्त्यावर बाळदेव परिसरातील एका नाल्यात दिलीप इंगोले या ४७ वर्षीय इसम दगडाने ठेचुन त्याचा असलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहे मिळालेल्या माहिती नुसार चुलत मोठ्या भावाणेच आपल्या लहान मतिमंद भावाची दगडाने ठेचून हत्या केली असल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे .या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार मोहरी येथील संतोष इंगोले व दिलीप इंगोले हे दोघे रात्री आपल्या मोटर सायकल ने अकोला येथून परत येत होते रस्त्यात मोटर सायकल नादुरुस्त झाल्या मुळे ते दोघे एका ठिकाणी थाम्बले असता अज्ञात कारणावरून दोघात वाद झाला व संतोष इंगोले याने दिलीप इंगोले यास दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून केला व त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला आज सकाळी ही घटना उघडकीस आली नेमका कोणत्या कारणा मुळे आरोपी संतोष ने दिलीप ची हत्या केली याचा उलगळा झाला नसून पोलीस याचा तपास करीत आहे या खून प्रकरणात लोकात वेग वेगळी चर्चा केली जात आहे प्रभारी पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे हे या घटनेचा तपास करीत असून संतोष ने चुलत भावाची हत्या का केली याचा उलगळा लवकरच होणार आहे दरमियान या प्रकरणातील आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे ,या प्रकरणी मंगेश पुंडलिक इंगोले यांच्या तक्रारी वरून भा. द .वि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .