Home मराठवाडा राज्यराणी एक्सप्रेस ला मानवत रोडला थांबा , साई स्मारक समिती कडून सत्कार

राज्यराणी एक्सप्रेस ला मानवत रोडला थांबा , साई स्मारक समिती कडून सत्कार

224

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी / पाथरी , दि. ११ :- प्रथमच सुरु झालेल्या मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस चे मानतरोड रेल्वे स्टेशनला स्वागत करण्यात आले.
रेल्वेने सीएसएमटी ते मनमाड राज्यराणी ही रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड पर्यंत चालू केली. मुंबईहून तसेच नांदेड हुन येणाऱ्या प्रवाशा करीता तसेच पाथरीला येणार्या साईभक्तां करीता रेल्वेने मानवत रोड रेल्वे स्टेशनला थांबा दिलेला आहे.

त्यामुळे शुक्रवार ११ जानेवारी रोजी श्रीसाई स्मारक समिती पाथरी साईबाबा जन्मस्थान मंदिराचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुल चौधरी कोषाध्यक्ष विश्वस्त सूर्यभान सांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी प्रभाकर पाटील पुजारी योगेश इनामदार यांनी नांदेड ते मंबई राज्यराणी एक्सप्रेसचे मानवत रोड स्टेशनला स्वागत केले . या गाडीचे चालक यांचा समितीचे वतीने शाल श्रीफळ साईबाबांची देऊन सत्कार केला. मानवत येथील व्यापारी वर्ग तसेच वार्ताहर संजय नाईक यांनीही रेल्वे चालकाचा शाल देऊन सत्कार केला.