Home बुलडाणा आडगावराजा येथील ३६८ घरांतील १४७२ लोकांचा सर्वे पुर्ण

आडगावराजा येथील ३६८ घरांतील १४७२ लोकांचा सर्वे पुर्ण

31
0

!!ग्रामपंचायत च्या वतिने कर्मचाऱ्यांचा केला सन्मान!!

सिंदखेडराजा 11(रामदास कहाळे)

कोरोणा च्या पार्श्वभूमीवर आडगावराजा येथील ३६८ घरांचा प्रतेक घरी जाऊन आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी सर्वेक्षण करुन १५५० लोकापर्यत एकुन स्री ७९० तर पुरुष ७६० आदी लोकांपर्यत पोहचऊन कोराना विषाणु संसर्गजन्य होऊ नये यासाठी सर्वे करण्यात आला आहे.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी गावस्तरावरील आशा सेवीका अंगणवाडी सेवीका आदी कर्मचारी यांनी प्रतेक घरी जाऊन सर्वे करण्याच्या सुचणा प्रशासनाच्या वतिने देण्यात आल्या होत्या या अनुषंगाने आडगावराजा
येथे अंगणवाडी सेवीका मिराबाई गोविंद अंभोरे व आशामती गजानन राजे जाधव तर आशा पर्यवेक्षिका सिंधु साबळे , आशा सेवीका शोभा धर्मराज जाधव व कल्पना सुरेंद्र कहाळे यांनी आडगावराजा येथील प्रतेक घरी जाऊन ३६८ कुंटुबाचा घरी जाऊन सर्वे करुन घरावर सर्वेक्षण क्रमांक सुद्धा टाकण्यात आला आहे –

!! याच पार्श्वभूमीवर कोरोनासाठी जिवाची पर्वा न करता प्रतेक घरी जाऊन कुटुंबाचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी अंगणवाडी सेविका , आशा सेवीका, ग्रामपंचायत कर्मचारी , आँपरेटर, ग्रामरोजगार सेवक , पोलिस पाटील आदी ना ग्रामपंचायत च्या वतिने सँनीटायझर, हँन्ड वाँश , साबण ,हँन्डक्लोज व मास्क व प्रतेकी एक हजार रुपयाचा चेक देऊन सन्मान करण्यात आला आहे .यावेळी सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे , ऊपसरपंच सुभाष राजे जाधव , ग्रामसेवक अशोक ठाकरे पोलिस पाटील निलेश शिनगारे तलाठी गिरी, व ग्रामपंचायत सदस्य गजानन राजे जाधव , विजय डोंगरे, मिलींद कहाळै , सुखदेव काळे, प्रकास सोनुने, ऊमेश चव्हाण , मधुकर चव्हाण यांच्या सह आदी ऊपस्थीत होते सदर कर्मचाऱ्यांचा सन्मान करतेवेळी सोशल डिस्टंसचा वापर करण्यात आला.