Home महत्वाची बातमी दातृत्वाला पैसे नाही तर “हृदय लागतं”

दातृत्वाला पैसे नाही तर “हृदय लागतं”

42
0

यवतमाळ – येथील कु.पद्मजा गणेश इंगळे हीचा आज आठवा वाढदिवस. तिने वर्षभरात खाऊच्या जमवलेल्या पैश्याची piggy Bank इंडियन मेडीकल असोसिएशन कडे आणुन जमा केली. IMA CORONA RELIEF FUND जो मेडिकल कॉलेज मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर , नर्स आणि इतर स्टाफसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट सारख्या कोट आणि इतर साहित्य पुरवण्यात येते. यासाठी लागणाऱ्या निधीकरीता आयएमएने नागरिकांना आवाहन केले आहे. पद्मजाने आयएमएच्या आवाहनाला साद देत , तीने तिची Piggy Bank इंडियन मेडीकल असोसिएशनचे सचिव डाॅ. प्रशांत कसारे यांचेकडे दान केली आणि आजच्या क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे जयंतीदिनी शपथ घेऊन हा वसा आयुष्यभर सुरु ठेवण्याचे हमी दिली. पद्मजा तुझ्या या दातृत्वाला पोलीसवाला ऑनलाइन मिडिया कडून सलाम पोरी. उदंड आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा….

Unlimited Reseller Hosting