महत्वाची बातमीविदर्भ

वडकी येथील खाकी वर्दी कर्तव्यदक्ष व सेवाभावी वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत गिते यांची सर्वसामान्य, गोरगरीब, गरजूं, भटकंती असलेल्यांना सेवाभावी मदत

Advertisements

वडकी – महेश हनवंते

यवतमाळ – सांप्रत कोरोना (कोविद-१९) व्हायरस मुळे अख्या जगातच नव्हे तर भारत देशातही वादळा सारखेच थैमान घातले असून देशात पुर्णत: लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य, गोरगरिब, भटकतीं असणाऱ्या लोकांचे जिवनमान विस्कळीत झाले आहे. यातच हातावर आणून, पाणावर खाणाऱ्या नागरीकांचां उदरनिर्वाह भागवीने अवघड झाले आहे.
सरकार, प्रशासन विविध स्तरावर योग्यती उपाययोजना राबवित असून खाकी वर्दीतील वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत गिते व उपपोलीस निरीक्षक घुले जनतेसाठी सतत कर्तव्यावर असून सामाजिक बांधीलकी जपत जनतेला सेवाभावी वृत्तीने मदत करित आहे.
वडकी पोलीस स्टेशन बिट अंतर्गत येत असलेल्या गावात कोणीही अन्नधान्या अभावी उपवासी न राहता कोरोनाच्या संकटासी जनतेने घरीच राहून प्रशासनास व देशासाठी सहकार्य करावे यासाठी ठाणेदार प्रशांत गिते गरजूंना मदत करित आहे. तसेच कोणी कुठेही अडचणीत असल्यास वडकी पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी नागरिकांना मदतीस तत्पर सेवा देत आहे. पोलीस स्टेशन सोबतच वडकी येथील ग्रा.पं. प्रशासन, पोलीस पाटील गणेश देऊळकर, व्यापारी व कृषी केंद्र चालक श्रीकांत गावंडे, चेतन धानोरकर, श्रीकांत मानकर, सोमेश्वर पिपराडे, धीरज झामड, डॉ.किशोर कारिया, पारखी, रविंद्र पाटील, तेजस ठक्कर, व इतरही व्यापारी मित्रपरिवार तसेच पत्रकार मंडळी जनतेच्या मदतीस सहकार्य करीत आहे.
आणि याच बिकट वेळी जे फक्त बॅनर- पोस्टरबाजी करणारे व फोटोसेशन ला प्राधान्य देणारी नेते मंडळी गजाआड झाली आहे. यामुळे जनतेत नेतेमंडळीवर रोश तर पोलीस प्रशासन, व्यापारी, कृषी केंद्र, पत्रकार यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे.

You may also like

विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...