Home जळगाव पाचोरा येथे सेवाभावी ग्रुप तर्फे गरिब व गरजवंताला दोन्ही टाईमचे मोफत जेवण

पाचोरा येथे सेवाभावी ग्रुप तर्फे गरिब व गरजवंताला दोन्ही टाईमचे मोफत जेवण

74
0

गरिबांसाठी धावले सेवा भावी ग्रुप… पाचोरा ✒️ निखिल मोर

कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये पाचोरा शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे. सेवाभावी ग्रुप, पाचोरा कडुन फक्त पाचोरा शहरातील बंदीच्या काळात अनेक गोरगरीब हे हातमजुर काम करून आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश बंद करण्यात आला आहे. या भयावह परिस्थितीत गोरगरिबांना आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .अशा परिस्थितीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन अशा गरजू व गरीब कुटुंबियांना दोन वेळेचे जेवण स्वतः घरोघरी जाऊन देत आहे.शहरातील ज्या गरजू लोकांना जेवण हवे असेल त्या लोकांनी खालील मोबाईलवर संपर्क साधावा. त्यानंतर आपण सांगितलेल्या ठिकाणी
जेवण पाठविले जाईल.
सदर सेवा फक्त पाचोरा शहराकरीता आहे. दुपारचे जेवण मागवण्यासाठी फोन करण्याची वेळ सकाळी ९ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत संध्याकाळचे जेवण मागवण्यासाठी फोन करण्याची वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असुन सदर सेवा फक्त पाचोरा शहराकरीता आहे. मोबाईल नंबर सिताराम अग्रवाल – 9422775375, अंकित अग्रवाल – 9028092344
मोहन अग्रवाल – 9422618318
बबलु संघवी – 9422774578
राजेश मोरस – 9890893131
यावेळी सेवाभावी ग्रुप तर्फ आवाहन करण्यात आले आहे की प्रशासनाला, व गावातील पोलीस बांधवाना मनापासून सहकार्य करा. कायदा हातात घेऊ नका. करोना हा खूप भयंकर आजार आहे. आपल्या कुटुंबाचा, गावाचा, नातेवाईकांचा आणि देशाचा विचार करा, “जिंदगी ना मिलेगी दुबारा” म्हणून घराबाहेर पडुच नका. देशाला सहकार्य करा. हीच देशभक्ती दाखवण्याची खरी वेळ आहे. आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करा.