Home महत्वाची बातमी “खासगी रुग्णालयांचा ताबा घ्या”, जगनमोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय ; आंध्र प्रदेशमधील...

“खासगी रुग्णालयांचा ताबा घ्या”, जगनमोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय ; आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने सर्व खासगी रुग्णालयं आणि स्टाफचा ताबा घेण्याचा आदेश

136
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

देशभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असतानाही राज्य सरकारेदेखील आपल्या पद्धतीने उपाययोजना करत आहेत. करोनाच्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठीही राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने सर्व खासगी रुग्णालयं आणि स्टाफचा ताबा घेण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश जारी झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी सर्व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीरकरण कक्ष निर्माण कऱण्याचा आदेश देऊ शकतात. जेणेकरुन करोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. आंध्र प्रदेशात करोनाचे २३ रुग्ण आहेत.
दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्येही करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता गाजियाबाद प्रशासनाने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचा आदेश दिला आहे. गाजियाबादमध्ये करोनाची सात प्रकरणं समोर आली आहेत. तर तीन डझनहून जास्त लोक क्वारंटाइन करण्यात आले आहेत.