
अक्कलकोट येथील लायन्स क्लब कडून पोलिसांना अल्पोहार.
पोलिसाकडून माणुसकीचे दर्शन, गरजुना मदतीचे हात पुढे.
वागदरी / नागप्पा आष्टगी
देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन खबारदारीचा उपाय म्हणुन अक्कलकोट तालुक्यात जमावबंदीचा काटेखोर पणे अंमलबजावणी होताना दिसुन येत आहे. जमावबंदीचा उल्लंघन करणा-यावर कडक कारवाई होणार आहे. तर जमावबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या वतीने अल्पोहार देण्यात आले. तर पोलिसाकडून गरजुना मदतीचे हात पुढे केले आहे.
देशात कोरोनो आजाराने थैमान घातला आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार समोर कठिण आव्हान उभे राहिले आहे. या आजारावर विजय मिळविण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणुन संपूर्ण देशात १४ एफ्रील पर्यंत देशात जमाबंदी आहे. या जमावबंदीत देखील मोठ्या प्रमाणात नागरिक जबाबदारी विसरून रस्तावरून फिरताना दिसुन येत आहे. म्हणुनच अक्कलकोट शहर व तालुक्यात काटेखोरपणे अंमलबजावणी करताना दिसुन आला. विनाकरण बाहेर ़फिरणा-यावर कारवाईचा बडगा बसत आहे. तसेच कामाशिवाय बाहेर फिरणा-यावर या पुढे गय केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.या वेळी पोलिस निरिक्षक कलप्पा पूजारी, उपविभागिय पोलिस अधिकारी डाँ संतोष गायकवाड, खाँ. अवताडे, बहिरगुडे, भंडारे, वाघमारे आदी परिस्थिवर लक्ष देऊन आहेत.
याच दरम्यान सेवा बजावणा-या पोलिस कर्मचा-यांना लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या कडून नास्टा, बिस्किट, पाण्याची बाटल वाटप करण्यात आले. तर पोलिसाकडून देखील गरजुना नास्टा, बिस्किट देवुन मानवतेचे दर्शन घडविले आहे. पोलिस निरिक्षक सोनाली पाटील मँडम हस्ते मदत देण्यात आले